agriculture news in marathi, Roopwatika of rice at two thousand hectors in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात रोपवाटिका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

पुणे  ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील तालुक्यांतील काही भागांत पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी रोपवाटिकेची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन हजार ३५ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. चालू आठवड्यात चांगला पाऊस झाला, तर वेळेवर भातरोप लागवडी होणार आहे.  

पुणे  ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील तालुक्यांतील काही भागांत पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी रोपवाटिकेची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन हजार ३५ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. चालू आठवड्यात चांगला पाऊस झाला, तर वेळेवर भातरोप लागवडी होणार आहे.  

यंदा जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवर भात लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी १५ ते २० दिवस आधी शेतकरी रोपवाटिका तयार करतात. सध्या भात रोपवाटिकेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणी भात रोवाटिकेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. येत्या आठ दिवसांत चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पुढील आठवड्यात भात रोपवाटिकेतील रोपांच्या पुनर्लागवडीस सुरवात होणार आहे.

यंदा शेतकरी भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणास जास्त प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोपवाटिका तयार केल्या आहेत. या रोपवाटिकेतील रोपेही लवकरच लागवडीसाठी तयार होणार असल्याची शक्यता आहे.

भाताबरोबर नाचणी पिकाच्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी नाचणी पिकाच्या रोपवाटिका तयार केल्या आहेत. या रोपवाटिकेतील रोपांची लागवड रोपे टाकल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी होते. जिल्ह्यात एकूण ६५ हेक्टरवर नाचणीच्या रोपवाटिका झाल्या आहेत.  

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...