agriculture news in marathi, round table conference decide to bring loanwaiver bill | Agrowon

दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफीसाठी स्वतंत्र विधेयके
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली : उत्पादन खर्चाच्या आधारे शेतीमालास दीडपट हमी मिळण्याचा अधिकार व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती ही विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्याचा निर्णय बुधवारी (ता. २८) येथे घेण्यात आला. तत्पूर्वी या विधेयकांचे आठ दिवसांत पुनरावलोकन करण्यासाठी शेतकरी संघटनेसह अन्य सोबतच्या पक्षांच्या खासदारांची समिती नेमण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

नवी दिल्ली : उत्पादन खर्चाच्या आधारे शेतीमालास दीडपट हमी मिळण्याचा अधिकार व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती ही विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्याचा निर्णय बुधवारी (ता. २८) येथे घेण्यात आला. तत्पूर्वी या विधेयकांचे आठ दिवसांत पुनरावलोकन करण्यासाठी शेतकरी संघटनेसह अन्य सोबतच्या पक्षांच्या खासदारांची समिती नेमण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ही विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडण्याबाबत चर्चा करण्यासाठी देशभरातील ३०हून अधिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आठ दिवसांत याबाबत सूक्ष्म अभ्यास करून ही विधयेके लोकसभा व राज्यसभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. या विधेयकांना उपस्थित सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दाखवत यामध्ये सहभागी असल्याचे जाहीर केले.

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, योगेंद्र यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही विधेयके मांडण्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट आहे. ही विधेयके महत्त्वाची असली तरी याबाबत सूक्ष्म व सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचे आहे. विधेयके मांडताना यातील बारीकसारीक तपशील घेणे, ते कोणत्याही मुद्यावरून फेटाळले जाऊ नये यासाठी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यामुळे सध्या उपस्थित काही खासदारांची एक समिती तयार करून त्यावर अभ्यास करावा, याला फार वेळ लागणार नाही. आठ दिवसांच्या कालावधीत ही विधेयके तयार करून ती दोन्ही सभागृहांत मांडावी लागतील. राज्यसभेत भाजप वगळता अन्य पक्षांची बलाबल जास्त आहे. यामुळे प्रामुख्याने पहिल्यांदा राज्यसभेत ही विधेयके मंजूर करावी लागतील. त्यानंतर ती लोकसभेपुढे ठेवावी लागतील. थोडे प्रयत्न केले तर हे शक्‍य आहे. 

 

खासदार शेट्टी यांनी ही विधेयके का महत्त्वाची आहेत, याबाबत सविस्तर महिती दिली. दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच कर्जाचा भार वाढत असल्याने शेतकऱ्यांत आत्महत्या सुरू आहेत. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही विधेयके संमत होण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक असल्याचे श्री. शेट्टी यांनी सागितले. 

यावेळी कॉंग्रेसचे मोहन प्रकाश, लोकसभेतील कॉंग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद यादव, माकपचे ज्येष्ठ नेते खासदार सीताराम येच्युरी, फारुख अब्दुल्ला, कनिमोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...