agriculture news in marathi, Rs. 129 crore loss to Nashik district bank | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नाशिक  : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.

नाशिक  : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.

अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून केदार आहेर यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने वसुलीवर भर देण्यात आला आहे. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरीही २५०९ कोटी ३७ लाख ४५ हजार रुपये थकबाकीपैकी ५०३ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षापासून बँक तोट्यात असून, त्यातून बाहेर निघण्यास ती चाचपडत आहे.

२०१७ -१८ मध्ये बँकेला नऊ कोटी तीन लाख २१ हजार रुपये तोटा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील तोटा १२० कोटी ४९ लाख ९४ हजार रुपये इतका होता. म्हणजे, सद्यःस्थिती एकूण तोटा १२९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांच्या घरात आहे. गेल्यावर्षी एनपीएसाठी ६७ कोटी ८९ लाख ७९ रुपयांच्या तरतुदी कराव्या लागल्या असल्यानेच तोटा झाल्याचे कारण अहवालात नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार करण्यात आला नाही.
सन २०१६-१९ मध्ये १७२० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.

कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने त्यांनी कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शिवाय बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय बँकेने घेतला. याशिवाय अन्य कारणेही तोट्यामागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे बँकेच्या ठेवींमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर ३३५८.४३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. याच ठेवी मार्च २०१७ अखेर ३१२१ .०६ कोटी रुपये, तर मार्च २०१८ अखेर २६१७.५३ कोटी रुपयांवर आल्या. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या १५२.३२ कोटी रुपयांच्या ठेवी ३.८८ कोटी रुपयांवर आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधी अडकून पडला. त्यानंतर बँकेतून ठेवी काढून घेऊन त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात आल्या. वैयक्तिक ठेवीही २२५६.७८ कोटी रुपयांवरून १७९०.४३ कोटी रुपयांवर आल्या. सहकारी संस्थांच्या ठेवी मात्र १४.३३ कोटी रुपयांनी वाढल्या असून, त्या ८२३ .२२ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्यानेच ठेवींचे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...