agriculture news in Marathi, rule of loan will loose for ethanol production, Maharashtra | Agrowon

इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष शिथिल करण्याचा विचार
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉलनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे निकष शिथिल करण्याच्या विचारात आहे. या कर्जावरील व्याजसवलतीचा लाभ घेण्यासाठीची कमाल मर्यादा उठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. सरकाराने १९ जुलै रोजी काढलेल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये व्याज सवलतीसाठी ८० कोटी रूपयांची कमाल मर्यादा जाहीर केली होती.   

नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉलनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे निकष शिथिल करण्याच्या विचारात आहे. या कर्जावरील व्याजसवलतीचा लाभ घेण्यासाठीची कमाल मर्यादा उठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. सरकाराने १९ जुलै रोजी काढलेल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये व्याज सवलतीसाठी ८० कोटी रूपयांची कमाल मर्यादा जाहीर केली होती.   

तसेच सरकारने थेट उसाच्या रसापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलला २०१८-१९ या हंगामासाठी प्रतिलिटर ४७.४९ रूपये इतका वाढीव दर जाहीर केला आहे. तर प्रचलित पद्धतीनुसार साखर तयार केल्यानंतर उरलेल्या मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर ४३.७० रूपये दर मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे थेट उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. उसाचा अतिरिक्त पुरवठा आणि साखरेच्या दरातील घसरण अशी परिस्थिती ओढवल्यास कारखाने साखर तयार करण्याऐवजी थेट इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देतील. सध्या जगात ब्राझील या देशात ही पध्दत अवलंबली जाते. साखरेचे दर कोसळल्यास थेट इथेनॉलनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचे ब्राझील सरकारचे धोरण आहे.

सरकारने इथेनॉलसाठी दुहेरी दर प्रणाली अवलंबण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे काही प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता अाहे, असे सूत्राने सांगितले. या प्रणालीमुळे अंतिम उत्पादन (इथेनॉल) एकच मिळणार असले तरी त्याचे दर वेगवेगळे राहणार आहेत. त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या सूत्राने स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून थेट उसाच्या रसापासून बनवलेले इथेनॉल आणि प्रचलित पद्धतीनुसार तयार केलेले इथेनॉल एकमेकांपासून वेगळे ओळखू येण्यासाठी कारखानास्तरावरच काही मार्ग काढण्याची आवश्यकता आहे, असे या सूत्राने सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...