agriculture news in marathi, Rural Development to be implemented through Gram Sadak Yojana: Chief Minister | Agrowon

ग्रामसडक योजनेतून साधणार ग्रामविकास : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

वर्धा : देशात व राज्यात रस्ते विकासाची कामे वेगात सुरू असून, जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्धा : देशात व राज्यात रस्ते विकासाची कामे वेगात सुरू असून, जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय) हिंगणघाट येथील टाका मैदान येथे वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील रस्तेविकासाच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम झाला. या वेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक संकटांवर मात करत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. राज्यात यंदा काही भागात पर्जन्यमान कमी झाले. १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत देण्यात येत आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाच्या झालेल्या विविध कामांमुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपयांची मदत आणि कर्जमाफी देण्यात आली. तीन वर्षांत साडेआठ हजार कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली.``

‘‘विदर्भातील सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. अमरावती येथील टेक्सटाइल पार्कप्रमाणेच विदर्भात अन्यत्रही त्याच्या उभारणीसाठी भरीव निधी देण्यात येईल. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. विदर्भातील नझुल जमिनींच्या संदर्भातील प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे,`` असेही फडणवीस यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, ‘‘स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी सिंदी ड्रायपोर्ट उभारण्यात येत आहे. याद्वारे आयात निर्यातीस चालना मिळणार आहे. येथे ब्रॉडगेज रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना उभारण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याची सिंचनक्षमता ५० टक्क्यांवर नेण्याचा मानस असून, जलयुक्त शिवार अभियान राज्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. १०८ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याद्वारे सिंचनक्षमता नक्कीच वाढेल. राज्यात ब्रिज कम बंधाऱ्यांची कामेही वेगात सुरू आहेत.``

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...