agriculture news in Marathi, Sachin Sawant says, government not serious on drought, Maharashtra | Agrowon

जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावे आठ दिवसांत दुष्काळसदृश कशी : सचिन सावंत
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

मुंबई : पंतप्रधानांनी जाहीर केलेली १६ हजार दुष्काळमुक्त गावे केवळ आठ दिवसांतच दुष्काळसदृश यादीत कशी दिसू लागली? सरकार त्या १६ हजार गावांची यादी प्रकाशित करत नाही, यातच दाल मे कुछ काला नाही तर सगळी डाळच काळी आहे हे स्पष्ट होत आहे. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. शासनाच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार अभियानावर ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात लोकसहभाग १० टक्केदेखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा लपवण्यासाठी राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

मुंबई : पंतप्रधानांनी जाहीर केलेली १६ हजार दुष्काळमुक्त गावे केवळ आठ दिवसांतच दुष्काळसदृश यादीत कशी दिसू लागली? सरकार त्या १६ हजार गावांची यादी प्रकाशित करत नाही, यातच दाल मे कुछ काला नाही तर सगळी डाळच काळी आहे हे स्पष्ट होत आहे. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. शासनाच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार अभियानावर ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात लोकसहभाग १० टक्केदेखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा लपवण्यासाठी राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

सावंत म्हणाले, की यंदा राज्यात २०१८ च्या ''जीएसडीएच्या'' अहवालानुसार २५२ तालुक्यांमध्ये १३ हजार ९८४ गावांत गेल्या ५ वर्षांच्या सरासरीपेक्षा १ मीटरपेक्षा अधिक भूजलपातळी खाली गेली असली, तरीही प्रत्यक्ष राज्यात त्याच अहवालानुसार एकूण ३१ हजार १५ गावांत पाण्याची पातळी खोल गेली आहे, ही जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करणारी वस्तुस्थिती आहे. फडणवीस सरकारचे जलयुक्त शिवार घोटाळ्यातील कंत्राटदार आणि सरकारचे हितसंबंध उघडे पडतील, म्हणूनच कमी पावसाचा दाखला देऊन शेतकऱ्यांनी उपसा केला. यातील घोटाळा दडवण्यासाठी ज्या गरीब शेतकऱ्याचा आडोसा सरकार घेत आहे. त्यांच्याच माथी दोष टाकण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. 

सावंत यांनी जीएसडीएचे २०१४ व २०१५ मधील अहवाल सादर केले. २०१४ मध्ये राज्यात शासनाच्याच आकडेवारीनुसार ७०.२ टक्के सरासरी पाऊस पडला होता. जीएसडीएच्या २०१४ च्या अहवालानुसार राज्यात त्या वेळी १९४ तालुक्यांतील केवळ ५ हजार ९७६ गावांत पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा अधिक कमी झाली होती. २०१५ मध्ये सर्वांत कमी म्हणजे ५९.४ टक्के पाऊस पडला होता. जीएसडीएच्या २०१५ च्या अहवालानुसार, २६२ तालुक्यांतील १३ हजार ५७१ गावांत भूजलपातळी १ मीटरपेक्षा खाली होती. या वर्षी सरासरी ७४.३ टक्के पाऊस पडूनही २०१४ व २०१५ पेक्षा जास्त म्हणजे १३ हजार ९८४ गावांत भूजलपातळी १ मीटर पेक्षा खाली जात असेल तर जलयुक्त शिवार अभियानाचा उपयोग शून्य झाला असून, हा घोटाळा आहे हे स्पष्ट होत आहे, असे सावंत म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...