agriculture news in marathi, sachin tendulkar, Rajya sabha | Agrowon

...अन् सचिनला भाषण करता आले नाही !
वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफीनाम्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी पुन्हा घातलेल्या गदारोळामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकर याची राज्यसभेतील भाषणाची संधी हुकली. देशातील क्रीडा क्षेत्राविषयी महत्त्वाच्या आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर सचिन संसदेत प्रथमच बोलणार होता. पण काँग्रेसच्या गदारोळामुळे त्याची ही संधी हिरावली गेली. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफीनाम्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी पुन्हा घातलेल्या गदारोळामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकर याची राज्यसभेतील भाषणाची संधी हुकली. देशातील क्रीडा क्षेत्राविषयी महत्त्वाच्या आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर सचिन संसदेत प्रथमच बोलणार होता. पण काँग्रेसच्या गदारोळामुळे त्याची ही संधी हिरावली गेली. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबद्दल मोदी यांनी राज्यसभेत येऊन माफी मागितली पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला आहे. यावरून शुक्रवारपासून काँग्रेसने राज्यसभेचे कामकाज होऊ दिलेले नाही. 

क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधण्यासाठी खासदार सचिन तेंडुलकरने वेळ मागितली होती. त्यानुसार, आज (गुरुवार) दुपारी दोनला त्याला बोलण्याची संधी मिळणार होती. त्यानुसार, सचिन बोलण्यासाठी उभा राहिल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी पुन्हा गदारोळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे निराश झालेला सचिन तब्बल ददा मिनिटे तसाच शांतपणे, एकही शब्द न उच्चारता जागेवर उभा राहिला. सभापती वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या खासदारांना वारंवार शांततेचे आवाहन केले. 'संपूर्ण देश तुमचे हे वर्तन पाहत आहे. शांत राहा आणि सचिनला बोलू द्या' असे आवाहन नायडू यांनी केले; पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत काँग्रेसने गदारोळ सुरूच ठेवला. 

सचिन तेंडुलकरला राष्ट्रपतींनी खासदारपदी नियुक्त केले आहे. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या खासदारांपैकी सचिनची कामगिरी चांगल्या वर्गात मोडते. खासदारांसाठी मिळणाऱ्या निधीपैकी 98 टक्के निधी खर्च केला आहे. सचिनने प्रस्ताव दिलेल्या प्रकल्पांपैकी 60 टक्‍क्‍यांहून अधिक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये दोन गावे दत्तक घेणाऱ्या मोजक्‍या खासदारांपैकी सचिन एक आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...