agriculture news in marathi, Sadabhau khot and Ravikant Tupakar criticizes each other | Agrowon

‘स्वाभिमानी-रयत क्रांती’मधील शीतयुद्धातून जनतेचे मनोरंजन
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

अकोला : सध्या विदर्भातील शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या शीतयुद्धामुळे छानपैकी मनोरंजन होऊ लागले आहे. विशेष करून स्वाभिमानी संघटनेचे नेते व या संघटनेतून बाहेर केलेले सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे.  कोरेगाव-भीमाप्रकरणी भाजपचा हात असल्याचा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आरोप केल्यानंतर दोनच दिवसांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुपकर यांचा नामोल्लेख टाळत ‘पारावरच्या टपोरी पोरांनी असे भडक वक्तव्य करू नये’, असा सल्ला दिला.

अकोला : सध्या विदर्भातील शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये रंगलेल्या शीतयुद्धामुळे छानपैकी मनोरंजन होऊ लागले आहे. विशेष करून स्वाभिमानी संघटनेचे नेते व या संघटनेतून बाहेर केलेले सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे.  कोरेगाव-भीमाप्रकरणी भाजपचा हात असल्याचा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आरोप केल्यानंतर दोनच दिवसांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुपकर यांचा नामोल्लेख टाळत ‘पारावरच्या टपोरी पोरांनी असे भडक वक्तव्य करू नये’, असा सल्ला दिला.

सध्या विदर्भात स्वाभिमानी पाय पक्के करण्यासाठी धडपड करीत आहे. यामुळेच संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी वारंवार या विभागात दौरे करीत आहेत. तर याच संघटनेचे दुसरे नेते रविकांत तुपकर सातत्याने विदर्भाच्या विविध जिल्ह्यांत दौरे करून सारखे चर्चेत राहतात. 

शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’ व खोत यांच्या ‘रयत क्रांती’ या संघटनांनी प्रामुख्याने वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत फोकस केल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानी बुलडाणा व वाशीममध्ये बऱ्यापैकी विस्तारलेली आहे. मात्र अकोल्यात अद्यापही पाय रोवता आलेला नाही. ‘रयत क्रांती’ ही संघटना तर एकदम नवखी आहे. तरीही बुलडाणा जिल्ह्यातून संघटनेची या भागात पाळेमुळे पक्की करण्याची मोहीम सुरू झाली आहे. बुलडाणा हा तुपकर यांचा बालेकिल्ला असल्याने त्याच जिल्ह्यात ‘रयत’ला वाढवून सदाभाऊ सुरुंग लावण्याचे काम करीत आहेत. या कार्यात साहजिकच तुपकर यांच्या विरोधकांचे सहकार्य, पाठबळ त्यांना चांगले मिळत आहे. 

ज्या भागात स्वाभिमानीच्या नेत्यांचे दौरे झाले त्या पाठोपाठ सदाभाऊ यांचे दौरे होत असताना दिसत आहेत. मूर्तिजापूर तालुक्‍यात शेट्टी-तुपकर यांनी नुकतीच कापूस प्रश्‍नावर सभा घेतल्यानंतर सदाभाऊंनी याच तालुक्‍यात शासकीय दौरा केला. यावेळी त्यांनी शासन शेतकरी हितासाठी कसे कटिबद्ध आहे हे जोरात सांगितले. सोबतच आपल्या जुन्या संघटनेतील सहकाऱ्यांच्या ‘उंची’ व वाढलेल्या सावलीचा मुद्दा उपस्थित केला. गावपारावर गप्पा करणाऱ्या पोरांनी आपली उंची पाहून बोलावे, असा सल्ला सदाभाऊंनी तुपकरांना दिला. या घडामोडी पाहता येत्या काळात ‘स्वाभिमानी’ व ‘रयत क्रांती’ संघटनांमध्ये आणखी आरोप-प्रत्यारोप बघायला मिळू शकतात.

शेतकऱ्यांना शीतयुद्ध नको
या संघटनांमधील आरोप-प्रत्यारोप मनोरंजन करीत असले तरी शेतकऱ्यांना याबाबत काहीही देणेघेणे नाही. नेत्यांनी आपापसात भांडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अधिक जोमाने लढावे, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...