agriculture news in Marathi, Sadabhau Khot says, condition of raper removed from benefit bowl worm effected farmers, Maharashtra | Agrowon

बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट रद्द : सदाभाऊ खोत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्याकरिता पूर्वी फॉर्म जी सोबत जोडाव्या लागणाऱ्या बियाणे पाकिटांची अट रद्द करण्यात आली असून, केवळ पावती आणि पंचनाम्याची प्रक्रिया झालेला शेतकरी मदतीसाठी पात्र राहील, अशी घोषणा कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत केली.

नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्याकरिता पूर्वी फॉर्म जी सोबत जोडाव्या लागणाऱ्या बियाणे पाकिटांची अट रद्द करण्यात आली असून, केवळ पावती आणि पंचनाम्याची प्रक्रिया झालेला शेतकरी मदतीसाठी पात्र राहील, अशी घोषणा कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत केली.

विधान परिषद सदस्य अमर पंडित यांनी या संदर्भाने विचारलेल्या लक्ष्यवेधीला त्यांनी उत्तर दिले. खोत म्हणाले, की २००७  मध्ये बिजी-2 तंत्रज्ञान हे गुलाबी बोंडअळीला बळी पडत असल्याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दिला होता. त्यानतर २०१० पासून हे तंत्रज्ञान प्रतिकारक्षम नसल्याचे पुन्हा संस्थेकडून कळविण्यात आले. परंतु दुर्दैवाने गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासंदर्भाने संशोधन किंवा उपाययोजना या काळात झाल्या नाहीत. बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात ९९६ बाटी बियाणे कंपन्यांचे वाण तपासण्यात आले.

यातील १५१ अप्रमाणीत आढळल्यानंतर  ११०1 कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या आहेत, उर्वरित कंपन्यांवरदेखील लवकरच कारवाई होईल. बोंडअळी प्रादुर्भावानंतर ७ डिसेंबर रोजी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले. एनडीआरएफ, बियाणे कंपन्या व राज्य सरकार अशी तीन टप्प्यात कापूस उत्पादकांना मदत दिली जाईल. पीकविमाधारकांना पीकविम्याची मदत देखील जाईल. राज्यात अप्रमाणित बियाणे जप्त करून साठा विक्रीबंद करण्यात आला. या साठ्याची पुढील हंगामात विक्रीची भीती लक्षात घेता हा साठा नष्ट केला जाईल. 

केंद्रेकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. 

इतर अॅग्रो विशेष
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...