कृषी राज्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्याचा खरीप आढावा

कृषी राज्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्याचा खरीप आढावा
कृषी राज्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्याचा खरीप आढावा

औरंगाबाद : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विदर्भानंतर रविवारी (ता. १०) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्‍तांच्या दालनातच पार पडलेल्या या बैठकीत पुन्हा एकदा यंदाचे खरीप नियोजन आणि त्यानिमित्ताने आढाव्यासह वाचन, सूचना आणि निर्देशाचा पाढा वाचण्यात आला.  हे सर्व होत असताना अपुऱ्या जागेमुळे बैठकीसाठी आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना आयुक्‍तांच्या दालनाबाहेर बैठक आटोपण्याची वाट पाहत बसावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यंदा खरीप हंगामासाठी केलेले नियोजन, खत बियाण्याची उपलब्धता यासह बोंड अळी नुकसान मदत, पीक विमा परतावा हे विषय बैठकीत प्राधान्याने चर्चील्या गेले. खरीप आढावा बैठकीनंतर बैठकीतील एकूणच चर्चेविषयी कृषी राज्यमंत्री खोत, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, कृषी आयुक्‍त डॉ. सच्चींद्रप्रतापसिंह यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. सुरुवातील डॉ. भापकर यांनी मराठवाड्यात बारा वर्षांत पडलेल्या पावसाचे प्रमाण, अलीकडच्या सहा वर्षांतील प्रमाण, पिकात झालेले बदल, शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे वाढलेला कल याविषयी आकडेवारीसह माहिती दिली.

मराठवाड्यात मागणीनुसार बियाणे व खते उपलब्ध होताहेत. ‘महाबीज’कडून १ लाख ७० हजार क्‍विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. शिवाय खासगी कंपन्यांमार्फत ४ लाख ७० हजार क्‍विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. श्री. खोत म्हणाले, की विदर्भातील खरीप हंगामाचा आढावा घेतल्यानंतर मराठवाड्यातील खरीप नियोजन व त्यानुसार तयारीचा आढावा घेतला जातो आहे. मराठवाड्यात पीक कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे. कर्जवाटप गतीने होण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन सूचना दिलेल्या असल्याने येत्या काळात मेळावे घेऊन सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्जवाटप करणे अपेक्षित आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दररोज कर्जवाटपाविषयी आढावा घेतला जातो आहे. ज्या बॅंका कर्ज वाटपाविषयी सजग राहणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाईची पावले उचलली जातील. त्यानंतरही जिथे कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य राहिल त्या ठिकाणी रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांना पाठवून स्वतंत्र कर्जवाटप मेळावे घेतले जातील. बोंड अळीमुळे होणाऱ्या नुकसानाला प्रतिबंध लावण्यासाठी गुजरातला तीन वर्षे लागली. महाराष्ट्रात मात्र त्याविषयी जागर मोहीम हाती घेण्यात आली असल्याने वर्षभरात शेतकऱ्यांच्या सहकार्यातून बोंड अळीमुळे होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण आणल्या जाईल. सर्व विभागातील खरीप हंगाम आढावा बैठकी आपण घेतो आहे. या बैठकांमध्ये प्राप्त होणारा अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. श्री. संतोष जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची आपल्याला माहिती नाही. आपण त्याविषयी माहिती घेऊ. दरम्यान जाधव यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे अनेक शेतकरी पोलिस ठाण्यात त्यांच्या सोबत थांबले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com