agriculture news in marathi, Sadhabhau khot and swabhimani strikes has personal matter | Agrowon

सदाभाऊंच्या गाडीवरील हल्ल्याला सत्ता संघर्षाची किनार
राजकुमार चौगुले
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर माढ्यात दगडफेक झाल्यानंतर कोल्हापूर, इस्लामपुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाचे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले नुकसान सत्ता संघर्ष आणि वैयक्तिक रागापोटीची प्रतिक्रिया मानली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व श्री. खोत यांच्यात हकालपट्टीनंतर संघर्ष तीव्र झाला. विविध सभा, सोशल मीडियाच्या माध्यमांतून एकमेकांना टार्गेट करीत टीका टिप्पणी करण्याचे प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत; पण हा संघर्ष आता टोकदार झाला आहे.

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर माढ्यात दगडफेक झाल्यानंतर कोल्हापूर, इस्लामपुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाचे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले नुकसान सत्ता संघर्ष आणि वैयक्तिक रागापोटीची प्रतिक्रिया मानली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व श्री. खोत यांच्यात हकालपट्टीनंतर संघर्ष तीव्र झाला. विविध सभा, सोशल मीडियाच्या माध्यमांतून एकमेकांना टार्गेट करीत टीका टिप्पणी करण्याचे प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत; पण हा संघर्ष आता टोकदार झाला आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्याकडून सदाभाऊंच्या गाडीवरील हल्ला हा शासनाविरोधातील प्रतिक्रिया असे स्पष्टीकरण देण्यात येत असले तरी स्वाभिानीचा श्री. खोत यांच्यावर असणारा रागच या हल्ल्याचे कारण ठरल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीत माढा मतदारसंघातून स्वाभिमानीचे सध्याचे तरुण नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. खोत हे माढा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. यामुळे त्यांना विरोध करण्यासाठीच स्वाभिमानीचा हा खटोटोप असल्याचीही चर्चा आहे. सध्या सरकार विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. सदोष पंचनामे, बोंड अळीग्रस्तांना नुकसानभरपाईसाठी विलंब या बाबी शेतकऱ्यांना संतप्त करीत असल्याने त्याचा निषेध म्हणूनच ही दगडफेक झाल्याचे समर्थन संघटना करीत आहे. हल्ला झाल्यानंतर स्वाभिमानीची कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कार्यालयाचे श्री. खोत समर्थकांनी फोडली. यामुळे तर हा वाद शासन पातळीपेक्षा वैयक्तिकच असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

सरकारचे इतर मंत्री असतानाही श्री. खोत हे स्वाभिमानीच्या रडारवर आहेत. एकेकाळच्या जीवलग असणाऱ्या शेट्टी व खोत समर्थकांतील वाद मात्र संघटनांच्या सच्च्या कार्यकर्त्यांना व्यथित करीत असल्याचे चित्र सध्या या पट्ट्यात आहे.

लोकसभा अन्‌ संघर्ष...
सध्या अनेक सभांमधून येणाऱ्या लोकसभेचे चित्र रंगविण्यात येत आहे. श्री. खोत यांची हातकणंगले किंवा माढा या दोन मतदारसंघांसाठी चाचपणी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडली आहे. श्री. खोत यांना दोन्ही मतदारसंघांत फिरकू द्यायचे नाही, अशी व्यूहरचना स्वाभिमानीकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानीच्या जुन्या शिलेदारांचा एकमेकांविरोधातील हा संघर्ष आता पहिल्यांदाच हिंसक वळणावर येऊन पोचला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...