औरंगाबाद, जालना, बीड जिल्हांत गहू, करडई पीकक्षेत्रात घट शक्य

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत ९ लाख १३ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रस्तावित क्षेत्रामध्ये गहू, करडई व इतर रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट येण्याचा अंदाज आहे.

प्रस्तावित २३ लाख हेक्‍टरवरील पेरणी क्षेत्रामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील ९ लाख १३ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. गतवर्षीच्या रब्बी हंगामात ७ लाख ९५ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली होती.

यंदा औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीनही जिल्ह्यांत रब्बी क्षेत्रात १४.८८ टक्‍के वाढ गृहीत धरून ९ लाख १३ हजार  हेक्‍टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये गहू, करडई व इतर रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट; तर रब्बी ज्वारी, हरभरा, मका पिकांच्या क्षेत्रात वाढ प्रस्तावित केली आहे.  

रब्बी ज्वारी :   यंदा रब्बी ज्वारीचे ३ लाख ९३ हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ८० हजार हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. २०१६-१७ मध्ये प्रत्यक्षात ३ लाख ६२ हजार क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाल्याने त्यामध्ये ३२.६० टक्‍के वाढ होणे कृषी विभागाला अपेक्षित आहे.

गहू : गव्हाचे सरासरी क्षेत्र १ लाख १० हजार हेक्‍टर असून, गतवर्षी प्रत्यक्षात १ लाख ६१ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली होती. यंदा मात्र सरासरी क्षेत्राच्या तुलनेत वाढ होणार असली तरी गतवर्षीच्या तुलनेत २४.२२ टक्‍के घट होणे अपेक्षित आहे.

हरभरा : हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १७ हजार हेक्‍टर असून गतवर्षी २ लाख १५ हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली होती. यंदा १६ टक्‍के वाढीसह २ लाख ५० हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

करडई : करडईचे सरासरी क्षेत्र ९ हजार हेक्‍टर असून गतवर्षी ६ हजार हेक्‍टवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा त्यामध्ये १६ टक्‍के घट अपेक्षित असून ५ हजार हेक्‍टरवर करडईचे क्षेत्र प्रस्तावित आहे.

मका : मकाचे सरासरी क्षेत्र १२ हजार हेक्‍टर असून गतवर्षी ४७ हजार हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली होती. यंदा त्यामध्ये १७ टक्‍के वाढ गृहीत धरून ५५ हजार हेक्‍टरवर मका पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

इतर पीक : इतर रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ११ हजार हेक्‍टर असून गतवर्षी ४ हजार हेक्‍टरवर इतर रब्बी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र या क्षेत्रात ६७ टक्‍के घट अपेक्षित असल्याने केवळ १३०० हेक्‍टरवर इतर रब्बी पिकांची पेरणी कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com