करडईचे लागवड क्षेत्र घटले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल हरभऱ्याकडे वाढल्यामुळे यंदा करडईच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. या तीन जिल्ह्यांत करडईचे सर्वसाधाण क्षेत्र ५२, ६०० हेक्टर असताना शनिवार (ता. १८) पर्यंत केवळ २,८४० हेक्टरवर पेरणी झाली होती.

दरम्यान, शनिवार(ता. १८)पर्यंत या तीन जिल्ह्यांत ३ लाख ७ हजार ३२ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. गहू, हरभरा पेरणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची मूठ अजून चाड्यावरच आहे.

नांदेड जिल्ह्यात रब्बीचे सर्वधारण क्षेत्र १ लाख ३३ हजार ४१५ हेक्टर आहे. शनिवारपर्यंत ज्वारीची १३ हजार ६१७ हेक्टरवर, गहू २,८०५ हेक्टरवर, हरभरा ७२ हजार १९८ हेक्टर आदींसह एकूण ९० हजार ६९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर आहे. शनिवारपर्यंत ज्वारीची ७५ हजार ४८ हेक्टर, गहू ६,७१४ हेक्टर, हरभरा ५२ हजार १८४ हेक्टर आदींसह एकूण १ लाख ३६ हजार ३१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर आहे. शनिवारपर्यंत ज्वारीची १० हजार ५३९ हेक्टर, गव्हाची १२ हजार ७४१ हेक्टर, हरभऱ्याची ५४ हजार ६१३ हेक्टर आदी पिकांसह एकूण ८० हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

दरम्यान, थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. तसेच अनेक भागात योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे गहू, हरभरा या पिकांच्या पेरणीसाठी शेत ओलविण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी रखडत चालली आहे. तीन जिल्ह्यंतील एकूण २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर आहे.

करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ५२ हजार हेक्टर रब्बी हंगामातील प्रमुख गळीत धान्य पीक असलेल्या करडईचे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ५२ हजार ६०० हेक्टर आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ८२ हेक्टर असताना १ हजार ११४ हेक्टरवर, परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र २५ हजार २०९ हेक्टर असताना १ हजार ५८२ हेक्टरवर, हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ३०९ हेक्टर असताना ११४ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com