agriculture news in marathi, sagroli KVK through mission for bond larvea | Agrowon

सगरोळी केव्हीकेतर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी विशेष मोहीम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सगरोळी, जि. नांदेड ः सगरोळी (जि. नांदेड) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन तसेच कीडनाशकांची विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी बुधवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. ३१) या कालावधीत विशेष पीक संरक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

सगरोळी, जि. नांदेड ः सगरोळी (जि. नांदेड) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन तसेच कीडनाशकांची विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी बुधवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. ३१) या कालावधीत विशेष पीक संरक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

होट्टल (ता. देगलूर) येथे बुधवारी (ता. २२) या मोहिमेचे उद्‌घाटन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच श्री. सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बोंड अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ही विशेष पीक संरक्षण मोहीम राबविली जात आहे.

केव्हिकेच्या कार्यक्षेत्रातील बिलोली, नायगाव, धर्माबाद, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, उमरी या तालुक्यांतील २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडीची ओळख, उपाययोजना, कामगंध सापळ्याचे महत्त्व व पिकांमध्ये उभारणी प्रात्यक्षिक, डोमकळ्या ओळखून नष्ट करणे, ५ टक्के निंबोळी अर्क तयार करून त्याची फवारणी घेणे, फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर आदी प्रात्याक्षिके घेतली जात आहेत.

कृषी विज्ञान केंद्रातील प्रा. कपिल इंगळे, डॉ. पराग तुरखडे, डॉ. दत्ता मेहत्रे, वैजनाथ बोंबले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील समन्वयक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती देत आहेत.

इतर बातम्या
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
मेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...