संत गजानन महाराज संस्थान करतेय आदिवासींची दिवाळी गोड
गोपाल हागे
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संत गजानन महाराज संस्थानतर्फे गेली ३५ वर्षे अादिवासींची दिवाळी गोड केली जात अाहे. संस्थानच्या विविध सेवा प्रकल्पाअंतर्गत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे आदर्श कार्य कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू अाहे. यावर्षी सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या हजारो आदिवासी बांधवांना दिवाळी सणानिमित्त कापड प्रसादाचे वितरण करण्यात आले.

शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संत गजानन महाराज संस्थानतर्फे गेली ३५ वर्षे अादिवासींची दिवाळी गोड केली जात अाहे. संस्थानच्या विविध सेवा प्रकल्पाअंतर्गत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे आदर्श कार्य कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू अाहे. यावर्षी सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या हजारो आदिवासी बांधवांना दिवाळी सणानिमित्त कापड प्रसादाचे वितरण करण्यात आले.

अाजही आदिवासी बांधव विकास तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांच्या जीवनातही दिवाळी यावी असा निर्णय शिवशंकरभाऊंनी ३५ वर्षांपूर्वी घेतला. तेव्हापासून कापड, प्रसादाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. दिवाळीचा आनंद आता आदिवासी बांधवही उपभोगत असून ‘जे का रंजले गांजले’ या तुकोबाच्या अभंगानुसार संस्थानचे सेवाकार्य सुरू आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थानचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक वैद्यकीय अशा क्षेत्रात एकूण ४२ सेवा योजना कार्यरत आहेत. आदिवासी बांधवांची सहकुटूंब दिवाळी साजरी व्हावी, म्हणून श्री संस्थेरा मागील ३५ वर्षांपासून अविरत नवीन कपड्यांचे वितरण तसेच मिष्ठान्न दिले जाते. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातील वसाडी, दयालनगर, पिंगळी, शेंबा, गुमठी व भिंगारा, चाळीसटपरी, गहुमार या आदिवासी भागात तसेच श्री क्षेत्र पंपासरोवर कपिलधारा नाशिक या ठिकाणी पुरुष, महिला, लहान- मोठे मुले व मुली अशा एकूण ८० हजारांच्यावर आदिवासींना ‘श्रीं’चा कापडप्रसाद व मिष्ठान्न वितरीत करण्यात अाले.

महंत श्री स्वामी सागरानंदजी सरस्वती महाराज, श्री स्वामी केशवानंदजी सरस्वती महाराज, आनंद आखाडा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर तसेच श्री संस्थेचे विश्‍वस्त व सेवाधारी यांनी सर्व तयारीनिशी अादिवासी भागात जाऊन कापड प्रसादाचे मिष्ठान्नासह वितरण केले.
 

इतर बातम्या
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
पीकविमा योजनेत पारदर्शकता आणा : द्राक्ष...नाशिक : सदोष पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...