येथे मुस्लिम महिलांच्या हस्ते होते गणपतीची आरती

...येथे मुस्लिम महिलांच्या हस्ते होते गणपतीची आरती
...येथे मुस्लिम महिलांच्या हस्ते होते गणपतीची आरती

मंचर, जि. पुणे  : मुस्लिम व हिंदू महिला एकत्रितपणे गेल्या दोन वर्षांपासून अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करत आहेत. मुस्लिम समाजातील महिलांच्या हस्ते येथे आरती होते. राष्ट्रीय एकात्मतेचे काम त्यांच्याकडून प्रभावीपणे राबविले जात आहे. साईश्रद्धा महिला बचत गटाच्या गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंचरच्या पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर अवसरी खुर्द गाव आहे. या गावात महिलांनी एकत्रित येऊन बचत गट स्थापन केला आहे. दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत ठराविक रककम जमा केली जाते. त्यातून गरजू महिलेला उद्योग व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यातून बारा सभासद महिलानी शिवन काम, खानावळ व पानपट्टीचे व्यायसाय सुरु केले आहेत. बचत गटाचे काम पाच वर्षापासून सुरु आहे. प्रत्येक मासिक बैठकित वैचारिक देवाण घेवाण केली जाते. त्यातूनच गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार पुढे आला. मुस्लिम समाजातील महिलांनी पाठींबा दर्शविला. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील महिला उत्साहाने आरती म्हणतात.

अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या वतीने २५० महिलांना तुळस व जास्वंदाची रोपे भेट देण्यात आली. साईश्रद्धा महिला बचत गट गणेश मंडळाच्या अध्यक्षा कमाल ठेंबेकर, उपाध्यक्षा रेखा काळदंते, खजिनदार नजमा तांबोळी यांच्या हस्ते महिलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाच्या सदस्या रिझवान तांबोळी, आशा तांबोळी, संचिता कोकाटे, योगिता शिंदे, पूनम शिंदे, दमयंती होनराव, सुरेखा शिंदे उपस्थित होत्या. किरण वळसे पाटील म्हणाल्या, हिंदू व मुस्लिम समाजात खऱ्या अर्थाने एकोपा निर्माण करण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम सामाजिक चळवळीला प्रेरणा व प्रोत्साहन देणारा आहे. यावेळी सरपंच सुनिता कराळे, माजी सरपंच शकुंतला शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संगीता शिंदे, सुषमा शिंदे, मोनिका भालेराव उपस्थित होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com