...अन् त्यांनी रेखाटला भावविश्‍वातील ‘कनव्हॉस’

सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.
सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.

पुणे ः बदलती जीवनशैली, बदलत्या वातारणामुळे बदलणारे ऋतुमान, एवढंच नव्हे, तर व्यसने, ब्ल्यू व्हेल गेम, मोबाईल, यामुळे होणारे गंभीर परिणाम... आणि माणसापासून खूप दूर गेलेला निसर्ग, जंगल, प्राणी अशा असंख्य गोष्टी लाखो विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी टिपत हृदयात साठविल्या. अखेर तो दिवस उजाडला आणि हृदयात साठलेल्या त्याच कल्पना लाखो विद्यार्थ्यांनी चित्रकलाकृतीद्वारे जगासमोर मांडल्या. बघता-बघता राज्याच्या कानाकोपऱ्यांत राहणाऱ्या कोवळ्या जिवांनी आपल्या नाजूक बोटांनी रंग, रेषांद्वारे आपल्या भावविश्‍वातील खरा ‘कनव्हॉस’ उभा केला. निमित्त होते, सकाळ चित्रकला स्पर्धेचे!  ‘चित्र रेखाटा, रंग भरा, कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घ्या'', असे सांगत विद्यार्थ्यांना रंग, रेषांच्या अनोख्या दुनियेची दारे खुली करून देणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’ला जाण्याच्या उत्साही वातावरणानेच रविवारची सकाळ उजाडली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील सर्व केंद्रांवर आपल्या मुलांना घेऊन पालकांची गर्दी हळूहळू होऊ लागली होती. साडेआठ वाजता गर्दीने उच्चांक गाठला. सकाळी ठिक नऊ वाजता पाचवी ते दहावीच्या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी विविध भागांतील केंद्रांवर स्पर्धा सुरू झाली. कधी पट्टीच्या साह्याने तर कधी नाजूक बोटे हळुवार फिरवित कोऱ्या कागदावर रेषा उमटू लागल्या. उंच उंच डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य, नदीचे झुळूझुळू वाहणारे पाणी, त्याभोवती हिरवागार निसर्ग, या निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्‍तपणे विहारणारे प्राणी, पक्षी... अशा स्वरूपात निसर्गाचे विविधरंगी रूप चित्रांमधून उलगडत गेले.   आपल्या डोळ्यांनी आत्तापर्यंत टिपलेला सभोवताल विद्यार्थ्यांनी चित्रांसाठी दिलेल्या विषयांमध्ये बसविण्यासाठी कसून प्रयत्न केला. रेषांच्या दुनियेतून काहीसे बाहेर येत विद्यार्थी पुन्हा रंगांच्या दुनियेत हरवले. स्पर्धेची वेळ संपत असनानाच त्या नाजूक बोटांमध्ये वीज संचारली. अखेर "ती'' चित्रकलाकृती पूर्ण झाली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपंख हळूवारपणे फिरत गेला.  दरम्यान, ग्लोबल कन्झुमर प्रॉडक्‍टस्‌ या प्रायोजक कंपनीने पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर व मुंबई येथील शहर केंद्रांतील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘लव्ह इट’ चॉकलेटचे वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com