agriculture news in marathi, Sakal publication's Diwali issues available on Amazon | Agrowon

'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था सकाळ माध्यम समुहाने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे 'सकाळ'चे सर्व दिवाळी अंक अॅमेझॉन डॉट इनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाले आहेत. 

पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था सकाळ माध्यम समुहाने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे 'सकाळ'चे सर्व दिवाळी अंक अॅमेझॉन डॉट इनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाले आहेत. 

जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून तुमच्या-आमच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्लेनषण आणि अनुभवसंपन्न विचार "शब्ददीप', "अॅग्रोवन', "सकाळ साप्ताहिक', "तनिष्का' आणि "प्रीमिअर' या दिवाळी अंकांमध्ये आहेत; शिवाय "सकाळ माध्यम समूहा'ने यंदा वाचकांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे. ती म्हणजे "सरकारनामा' या राजकीय विशेषांकाची! ​
 

Image may contain: 11 people, people smiling, text

राजकीय महासर्वेक्षणः सरकारनामा 
(Marathi Diwali Ank Sarkarnama available on Amazon)

सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी "सरकारनामा' ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी "सरकारनामा'च्या दिवाळी अंकामध्ये आहे. 2019 मध्ये हुकूमाचा एक्का कोण ठरणार, या बद्दल जनतेच्या मनातील महासर्वेक्षणही अंकामध्ये प्रसिद्ध होईल.​
 

Image may contain: outdoor

माणसांच्या गोष्टीः शब्ददीप
(Marathi Diwali Ank Shabdadeep available on Amazon)
सध्याच्या सामाजिक घुसळण बघता डावीकडून उजवीकडे नेमका काय आहे भारत ? हे उलगडणारा परिसंवाद 'आयडिया ऑफ इंडिया' हे शब्ददीपचे विशेष आकर्षण असेल. त्याचबरोबर लेहपासून केरळपर्यंतच्या प्रवासामध्ये भेटलेली भन्नाट माणसं आणि त्यांच्या अफलातून कथा यांचे रिपोर्ताज या दिवाळी अंकात असतील. राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणीही अंकात आहेत. 
 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

प्रश्नांची उत्तरेः अॅग्रोवन
(Marathi Diwali Ank Agrowon available on Amazon)
शेतीतील समस्यांवर सकारात्मक मार्ग काढणाऱ्यांच्या यशोगाथांनी "अॅग्रोवन'चा दिवाळी अंक सजलेला आहे. मजूर समस्येवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा अंकात आहेत. शिवाय, कृषी क्षेत्रातील नवनवे शोध, बदलणारी शेती यावरही मौलिक विचारधन या अंकात आहेच. ​
 

Image may contain: 1 person, close-up and text

Image may contain: 1 person, close-up

Image may contain: 1 person, smiling, text

सकाळ साप्ताहिकतनिष्का आणि प्रिमीयर
(Marathi Diwali Ank Sakal Saptahik, Tanishka & Sakal Premier available on Amazon)

याशिवाय, आयुष्य बदलून टाकणारे अनवट प्रवास आपल्या भेटीस येणार आहेत "सकाळ साप्ताहिक'मधून, तर खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटांची कहाणी असेल "तनिष्का'मध्ये..! मनोरंजनाच्या दुनियेतील बित्तंबातमी घेऊन, त्याजोडीला स्टार्स आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येत आहे "प्रीमिअर' हा दिवाळी अंक.. 

हे सर्व अंक अॅमेझॉनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाल्याने यावर सवलतीच्या दरात घरपोच अंक मिळविण्याची सुवर्णसंधी वाचकांसाठी आहे.
 

सकाळचे दिवाळी अंक आता अमेझॉनवर !
वाचकांसाठी विशेष सोय.. आता आपला दिवाळी अंक घरपोच मिळवा.. 

शब्ददीप: https://goo.gl/XwXccB
सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w
अॅग्रोवन: https://goo.gl/Jn7VTF
साप्ताहिक सकाळ: https://goo.gl/66fLKh
तनिष्का: https://goo.gl/793JRP
प्रिमीयर: https://goo.gl/wA31Nx

इतर बातम्या
परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे...परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या...
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या...अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत...
देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटकावाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा...
वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षाअकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी...
कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा...नांदेड ः निरोगी मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी...
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेच्या...मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत...
कॉँग्रेस नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने...नगर  ः कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते...
सरसकट कर्जमाफीसाठी सरकारला विनंती करू ः...शेटफळगढे, जि. पुणे : यूपीए सरकारच्या काळात आपण...
रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम...पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या...
नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे...नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १...अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे...
यवतमाळ बाजार समितीत हळद खरेदीस प्रारंभयवतमाळ  ः जिल्ह्यात हळदीखालील क्षेत्रात वाढ...
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी...बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलंकोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...