SakalSaamExitPolls : पश्चिम महाराष्ट्रात युती, आघाडीला समान जागा

SakalSaamExitPolls : पश्चिम महाराष्ट्रात युती, आघाडीला समान जागा
SakalSaamExitPolls : पश्चिम महाराष्ट्रात युती, आघाडीला समान जागा

आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. २०१४ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा पाच जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोल २०१९ : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. २०१४ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा पाच जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. 

महाराष्ट्राचा अचूक अंदाज सकाळ आणि साम वाहिनीने दिला आहे. सर्वांत विश्वसनीय एक्झिट पोल म्हणून याकडे पाहिले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण १० जागा असून यापैकी भाजपला ४, शिवसेनेला १ अशा एकूण पाच जागांवर युतीला विजय मिळेल. तर, राष्ट्रवादीची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मागील चारही जागा कायम राखण्यात यश मिळेल असे चित्र आहे. याबरोबर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानीची जागा आघाडीकडे राहिल असे चित्र आहे. त्यामुळे आघाडी आणि युती या दोघांनाही समसमान यश मिळताना दिसणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com