SakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका

SakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका
SakalSaamExitPolls : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस जोमात; विदर्भात फटका

महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला ४ जागांवर विजय मिळण्याचा सकाळ - सामच्या अंदाजात व्यक्त केला जात आहे. 

एक्झिट पोल २०१९ : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला ४ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

विदर्भात लोकसभेच्या १० जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपला बालेकिल्ल्यात धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचा ४ जागांवर विजय होईल तर काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com