SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा

SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा
SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला ०५ तर आघाडीला ०३ जागा

मराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला ०१ तर राष्ट्रवादीला ०२ जागा मिळण्याच्या सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणाचा अंदाज

एक्झिट पोल २०१९ : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. सकाळ आणि सामनेही याबाबत अंदाज दिले आहेत.

मराठवाड्यात एकूण ०८ जागा असून ०८पैकी भाजप ०३, शिवसेना ०२, राष्ट्रवादी ०२ तर काँग्रेस ०१ जागेवर विजयी होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच मराठवाड्यातील ०५ जागांवर युती तर ०३ जागांवर आघाडीचा विजय होईल, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडुकीमध्ये युतीला ०६ तर आघाडीला ०२ जागांवर यश मिळाले होते. या निवडणुकीत सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणांनुसार युतीला एका जागेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूण जागांपैकी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ०३, शिवसेनेला ०३ तर काँग्रेसला ०२ जागांवर यश मिळाले होते या निवडणुकीत मात्र काँग्रेसला ०१ आणि शिवसेनेला ०१ जागेचा फटका बसताना दिसत असून राष्ट्रवादीला ०२ जागांचा फायदा होणार असल्याचे सकाळ आमि सामच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून  सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला २९ आणि आघाडीला १९ जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com