SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी ०२ जगा

SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी ०२ जगा
SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी ०२ जगा

सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार, - मुबईत युतीला ०४ तर, आघाडीला ०२ जागांवर यश  - २०१४ च्या तुलनेत युतीला मुंबईत ०२ जागांचा फटका - काँग्रेसला मिळणार ०२ जागांवर यश 

एक्झिट पोल २०१९ : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. 

महाराष्ट्राचा अचूक अंदाज सकाळ आणि साम वाहिनी देत असून मुंबईत एकूण ०६ जागा असून यापैकी भाजपला ०२, शिवसेनेला ०२ आणि राष्ट्रवादीला ०२ जागा मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादीला मात्र मुंबईत एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत युती ०६ पैकी ०४ जागा कायम ठेवण्यात यश मिळवेल तर आघाडी ०२ जागांवर यशस्वी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजप ०३ तर शिवसेना ०३ जागांवर यशस्वी झाली होती. २०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रावादीला एकही जागा जिंकता आली नव्हती २०१९ च्या निवडणुकीत मात्र, राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता नाही आली तरी काँग्रेस ०२ जागांवर यशस्वी होईल अशी शक्यता सकाळ आणि सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा अचूक एक्झिट पोल साम वाहिनी देत असून  सकाळ आणि साम वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा युतीलाच मिळतील, तर आघाडीनेही जोरदार लढत दिल्याचे चित्र आहे. युतीला २९ आणि आघाडीला १९ जागा मिळण्याचा अंदाज साम वाहिनी आणि सकाळच्या एक्झिट पोलने वर्तविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com