नांदेड जिल्ह्यात १ लाख ४० हजार क्विंटल बियाणे विक्री

नांदेड जिल्ह्यात १ लाख ४० हजार क्विंटल बियाणे विक्री
नांदेड जिल्ह्यात १ लाख ४० हजार क्विंटल बियाणे विक्री

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जुलैअखेरपर्यंत विविध पिकांच्या १ लाख ४० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, ४ हजार ९७८ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. विविध ग्रेडच्या १ लाख ४० हजार ९४८ टन खतांची विक्री झाली असून, ३९ हजार ४९७ क्विंटल खतसाठा शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या खरीप हंगामात सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादक कंपन्यांकडून ६० हजार ८६० क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडून ४३ हजार ९०३ क्विंटल असे एकूण १ लाख ४ हजार ७६३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात सार्वजनिक कंपन्याकडून २७ हजार ९७० क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडून १ लाख १९ हजार ९१८ क्विंटल असे एकूण १ लाख ४५ हजार ७ क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला होता.

त्यापैकी ज्वारीच्या ३ हजार ६२९ क्विंटल, तुरीचे २ हजार ३०३ क्विंटल, मुगाच्या ८२० क्विंटल, उडदाच्या १ हजार ४३० क्विंटल, मक्याचे ६ क्विंटल, सोयाबीनच्या १ लाख २७ हजार ३३१ क्विंटल, कपाशीच्या ४ हजार ५०१ क्विंटल असे एकूण १ लाख ४० हजार २९ क्विंटल बियाची विक्री झाली. ज्वारीचे २ हजार १०३ क्विंटल, तूरीचे ४९२ क्विंटल, मुगाचे ३७८ क्विंटल, उडदाचे ५८८ क्विंटल, सोयाबीनचे ५०० क्विंटल, कपाशीचे ९०२ क्विंटल आदी पिकांचे एकूण ४ हजार ९७८ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

१ लाख ४० हजार ९४८ टन खतांची विक्री यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ३ हजार ४५० टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. गतवर्षीचा ७६ हजार ९९५ टन खतसाठा शिल्लक होता. त्यामुळे एकूण १ लाख ८० हजार ४४५ टन खतसाठा उपलब्ध होता. जुलैअखेरपर्यंत १ लाख ४० हजार ९४८ टन खतांची विक्री झाली. अजून युरिया २ हजार ३०० टन, डीएपी ९ हजार ४७९ टन, पोटॅश ११ हजार ३८७ टन, संयुक्त खते (एनपीके) १२ हजार ३२६ टन, सुपर फॉस्फेट ३ हजार ४७८ टन असा एकूण ३९ हजार ४९७ टन खतसाठा शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com