agriculture news in marathi, Sale of 65 to 70 ton strawberries per day in Satara | Agrowon

साताऱ्यात दररोज ६५ ते ७० टन स्ट्रॉबेरीची विक्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

सातारा (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीचा दुसरा बहर सुरू झाला आहे. सध्या असलेली थंडी स्ट्रॉबेरी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे. एकट्या महाबळेश्वरसह इतर तालुक्‍यांतून प्रतिदिन ६५ ते ७० टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे.   
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍यासह जावळी, वाई, कोरेगाव, सातारा   तालुक्‍यांत परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. एकूण झालेल्या लागवडीत महाबळेश्वर तालुक्‍यात सार्वधिक २५०० एकर, तर अन्य तालुक्‍यांत सुमारे एक हजार एकर, असे एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे.

सातारा (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीचा दुसरा बहर सुरू झाला आहे. सध्या असलेली थंडी स्ट्रॉबेरी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे. एकट्या महाबळेश्वरसह इतर तालुक्‍यांतून प्रतिदिन ६५ ते ७० टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे.   
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍यासह जावळी, वाई, कोरेगाव, सातारा   तालुक्‍यांत परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. एकूण झालेल्या लागवडीत महाबळेश्वर तालुक्‍यात सार्वधिक २५०० एकर, तर अन्य तालुक्‍यांत सुमारे एक हजार एकर, असे एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे.

थंडी ठरतेय उपयुक्त
स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे, परिणामी कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. हंगामाच्या सुरवातीस आलेली स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी जास्त असते. यामुळे या काळात चांगला दर मिळण्यास मदत होत आहे.

पर्यटकांना होतेय थेट विक्री
सध्या स्ट्रॉबेरीस १७५ ते २०० रुपये प्रतिकिलो दर सुरू असून, दिवसाकाठी ५५ ते ६० टन स्ट्रॉबेरी महाबळेश्वर तालुक्‍यातून मुंबई, पुणेसह बेंगळूर, हैदराबाद, कोलकता, रांची आदी मोठ्या शहरांत विक्रीसाठी जात आहे. तसेच दोन ते तीन टन स्ट्रॉबेरी प्रक्रियेसाठी जात आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुट्ट्या लागून आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी शहरांत आले होते. तसेच शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले आहेत. मात्र शेतकरी पर्यटकांनाच स्ट्रॉबेरीची थेट विक्री करण्यावर भर देत आहेत. मोठ्या शेतकऱ्यांकडून बॉक्‍स पॅकिंग करून स्ट्रॉबेरी पाठवली जात असल्यामुळे त्यास चांगला दर मिळण्यास मदत होत आहे.

एप्रिल, मेपर्यंत चालणार स्ट्रॉबेरी हंगाम

यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस उशीर झाल्याने हंगामही उशिरा सुरू झाला आहे. परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या दुसऱ्या बहरातील सुमारे २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. हा हंगाम एप्रिल, मे महिन्यांपर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, एप्रिल व मे महिन्यांतील पाणीटंचाईच्या स्थितीवर हंगामाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मात्र सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरळीत सुरू असून, समाधानकारक दर मिळत आहेत. एप्रिल, मेपर्यंत हंगाम सुरू राहील असा अंदाज आहे.
- किसनराव भिलारे,
अध्यक्ष महाबळेश्वर सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्था.

 

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...