agriculture news in marathi, sale of unregistered products, ban, insecticide, rejected, pune | Agrowon

बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी उठविण्यास नकार
मनोज कापडे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

'कायद्यानुसार नोंदणी नसलेली कीटकनाशके, खत नियंत्रण कायदा तसेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या सूचित नसलेली संजीवके, भुसाधरके इतर उत्पादने मान्यताप्राप्त दुकानांमधून विकता येणार नाहीत. हा निर्णय कृषी आयुक्तालयाचा नसून राज्य शासनाचा आहे. आम्हाला कायद्यानुसार कामकाज करावे लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली उत्पादने मान्यताप्राप्त दुकानांमध्ये विक्री करण्यास तात्पुरती मुदतवाढ देण्यास कृषी आयुक्तालयाने ठाम नकार दिला आहे. त्यामुळे आता बिगरनोंदणीकृत उत्पादनांच्या कंपन्या न्यायालयात जाण्याची तयारी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात कृषी खात्याने परवाना दिलेल्या कृषीसेवा विक्री केंद्रांना नोंदणी नसलेल्या खते, कीडनाशकांची विक्री करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. यवतमाळमध्ये कीटकनाशकांमधून विषबाधा झाल्याचे प्रकरण घडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कीटकनाशके कायदा १९६८ च्या यादीत समाविष्ट नसलेल्या बिगर नोंदणीकृत पीकवाढ संजीवकांना तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मध्ये समाविष्ट नसलेल्या भूसुधारकांना व इतर उत्पादनांची विक्री यामुळे थांबली आहे.

याबाबत राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतास सिंह यांची अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी भेट घेतली. 'बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा विकण्यास प्रतिबंध करणारा आदेश जारी केल्यानंतर शेतक-यांच्या समस्या वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची उलट फसवणूक होईल. त्यामुळे २०१० च्या शासन निर्णयाप्रमाणे बिगरनोंदणीकृत उत्पादने विकण्यास परवानगी द्या, अशी मागणी असोसिएशनने केली.

कृषी आयुक्तांनी मात्र तशी मान्यता देण्यास ठाम नकार दिला. अर्थात, ही समस्या मांडण्यासाठी तुम्ही इतर पर्यायांचा विचार करावा, असा सल्लाही आयुक्तांनी दिला. 'कायद्यानुसार नोंदणी नसलेली कीटकनाशके, खत नियंत्रण कायदा तसेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या सूचित नसलेली संजीवके, भुसाधरके इतर उत्पादने मान्यताप्राप्त दुकानांमधून विकता येणार नाहीत. हा निर्णय कृषी आयुक्तालयाचा नसून राज्य शासनाचा आहे. आम्हाला कायद्यानुसार कामकाज करावे लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बिगरनोंदणीकृत उत्पादनांना परवाना मिळवून देण्यासाठी यासाठी आधीच्या आयुक्तांनीच पुढाकार घेतला होता. त्यासाठी अनेक उत्पादनांच्या चाचण्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आल्या आहेत. या उत्पादनांच्या विषविषयक परीक्षणाचे कामदेखील सुरू आहे. त्यासाठी कंपन्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने घेतलेल्या दुहेरी भूमिकेवर कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आता अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून न्यायालयात जाण्याची तयारी सुरू आहे. 'शासन याबाबत संभ्रमात टाकणारी भूमिका घेत आहे. आमची उत्पादने कृषी सेवा केंद्रांमधून विकली न गेल्यास ती इतर माध्यमातून विकली जातील. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आता आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असे असोसिएशनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

 

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...