टक्केवारी खात नसाल तर तुम्हाला सलाम ः पणनमंत्री
गणेश कोरे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे शाेषण, हिशेबपट्ट्या कशाप्रकारे केल्या जातात, याकडे सभापतींनी लक्ष देण्याची गरज आहे.
-सुभाष देशमुख , सहकार व पणनमंत्री

पुणे ः १२ (१) च्या परवानग्यांसाठी आम्हाला चिरीमिरी द्यावी लागते. त्याशिवाय मंजुरीच मिळत नाही. या बाजार समित्यांच्या सभापतींनी केलेल्या तक्रारींचा आधार घेत, बाजार समित्यांमध्ये हिशेबपट्ट्या कशा हाेतात? बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे शाेषण काेण करते? आणि तुम्ही काय टक्केवारी काढत नाहीत का? असे प्रतिप्रश्‍न करत, पैसे नसाल काढत तर मी तुम्हाला सलाम करताे, असे म्हणत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समित्यांच्या वर्मावरच बाेट ठेवले.

आपल्या कामकाजाचे वास्तव मंत्री मांडत आहे, याची जाणीव झाल्याने संपूर्ण सभागृह निःशब्द झाले हाेते. मंत्र्यांकडून हाेणारी कानउघाडणी एेकल्यानंतर दाेनच सभापतींनी याला विराेध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २८) पुण्यात झाली. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, संघाचे सभापती दिलीप माेहिते पाटील, उपसभापती विजय खवास यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते.

सभेला मार्गदर्शन करताना मंत्री देशमुख म्हणाले, ‘‘बाजार समित्यांनी शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण करत पारदर्शी कामकाज केल्यास काेणीही तुम्हाला आडवे येणार नाही. देशाने जागतिकीकरणाचे धाेरण स्वीकारले आहे. खासगी उद्याेगांशी स्पर्धा करण्यासाठी बाजार समिती सभापती आणि संचालकांनी आपल्या स्वभावात आणि समित्यांनी आपल्या कामकाजात बदल करणे आवश्‍यक आहे. तुम्हाला खासगी समित्यांशी स्पर्धा करावीच लागणार आहे. बाजार समित्या बंद करण्याचा काेणताही विचार सरकारचा नाही.’’

१२ (१) च्या परवानग्यांसाठी पणन संचालनालय, पणन मंडळामध्ये चिरीमिरी द्यावी लागते, या बाजार समित्यांनी केलेल्या आराेपावर बाेलताना मंत्री देशमुख म्हणाले, ‘‘समाेरचा काय मागेल याचा विचार न करता आपण प्रामाणिकपणे काम केल्यास चिरीमिरीच्या नावाखाली पैसे काढता येणार नाही. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे शाेषण, हिशेबपट्ट्या कशाप्रकारे केल्या जातात, याकडे सभापतींनी लक्ष देण्याची गरज आहे.’’

बाजार समिती संघाचे अध्यक्ष दिलीप माेहिते यांनी बाजार समित्यांच्या विविध अडचणी प्रास्ताविकात मांडल्या. या वेळी विविध बाजार समित्यांना वसंतदादा पाटील आदर्श बाजार समिती पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार संघाचे उपसभापती विजय खवास यांनी मानले.

जेवढे प्रस्ताव तेवढे पुरस्कार
बाजार समिती संघाच्या वतीने यंदापासून राज्यातील विविध बाजार समित्यांना वसंतदादा पाटील आदर्श पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. यासाठी संघाने बाजार समित्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले हाेते. या वेळी जेवढे प्रस्ताव आले तेवढ्यांना पुरस्कार देण्यात आल्याचे संघाचे सभापती दिलीप माेहिते यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...