पणन आयुक्तपदी संपदा मेहता

पणन आयुक्तपदी संपदा मेहता

मुंबई ः राज्यातील तूर, हरभरा आदी शेतीमालाच्या शासकीय खरेदीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी (ता. १६) पणन आयुक्तपदी मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे पणन मंडळ, पणन महासंघ आणि ग्राहक महासंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी मुंबईत त्यांचे कार्यालय राहील. राज्य सरकारने सोमवारी तब्बल २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  नगरचे महापालिका आयुक्त जी. सी. मांगले यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडे मुंबईत महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या मुख्याधिकारीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अहमदनगरचे महापालिका आयुक्त जी. सी. मांगले यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे, तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी ए. एम. महाजन यांना पाणीपुरवठा विभागात उपसचिव करण्यात आले आहे.  जालन्याचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे यांना मुंबई जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, संजय यादव यांची एमएमआरडीएमधून थेट अकोल्याच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आता पुणे जिल्हाधिकारी असतील, तर नवलकिशोर यांच्या जागी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची अहमदनगर जिल्हाधिकारीपदी बदली नाकारण्यात अाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणे महापालिकेत आणण्यात आले असून, त्यांच्यावर पुणे महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com