agriculture news in marathi, Samruddhi Highway project land acquisation, Nashik | Agrowon

सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ‘समृद्धी’साठी शेतकऱ्यांवर दबाव
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकारी पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबत त्यांनी विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकारी पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबत त्यांनी विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी संबंधित अधिकारीही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले आहेत. जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून हा प्रस्तावित महामार्ग जातो. या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, काही गावांतील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध कायम आहे. परिणामी, भूसंपादन अधिकारी महेश पाटील या गावांतील शेतकऱ्यांवर पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, कचरू पाटील, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, रावसाहेब हारक, शांताराम ढोकणे आदींनी केला आहे. भूसंपादन अधिकारी प्रांत महेश पाटील यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त झगडे यांनी दिले.

संघर्ष समितीच्या मागण्या
इगतपुरी तालुक्यातील तब्बल १७ ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. या महामार्गाच्या भूसंपादनप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातही ३३ खटले दाखल झाले आहेत. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत, त्या टाळाव्यात, भूसंपादन कायदा २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी आदी मागण्या शेतकरी संघर्ष समितीने विभागीय आयुक्तांकडे केल्या आहेत.

पेसाअंतर्गत ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव करून समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे, तरीही भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यांवर दबाव टाकून भूसंपादनाचा प्रयत्न करीत आहेत. भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई न झाल्यास शेतकरी संघर्ष समिती बेमुदत उपोषण करेल.
- राजू देसले, समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समिती.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...