agriculture news in marathi, Samruddhi rate In the discussion | Agrowon

समृद्धीच्या दरातील तफावतीचा मुद्दा ऐरणीवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

औरंगाबाद (प्रतिनिधी) : समृद्धी मार्गबाधित शेतकरी व प्रशासनाची बैठक गुरुवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी एकाच दरातील तफावतीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर प्रशासन निरुत्तर झाले. तर खासदार चंद्रकांत खैरे यांनी समृद्धी मार्गबाधितांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍नांचे प्रशासकीय स्तरावरून तातडीने निराकरण करण्याची सूचना प्रशासनाला केली.

औरंगाबाद (प्रतिनिधी) : समृद्धी मार्गबाधित शेतकरी व प्रशासनाची बैठक गुरुवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी एकाच दरातील तफावतीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर प्रशासन निरुत्तर झाले. तर खासदार चंद्रकांत खैरे यांनी समृद्धी मार्गबाधितांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍नांचे प्रशासकीय स्तरावरून तातडीने निराकरण करण्याची सूचना प्रशासनाला केली.

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनात औरंगाबाद अव्वल ठरले आहे. असे असताना हवा तसा दर मिळत नसल्याने जमिनी देण्यास आजही काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. या विषयावर गुरुवारी (ता. ३०) प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसह झालेल्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकाच गट नंबरमध्ये दोन भाव का देता, असे म्हणत अधिकाऱ्यांचे कान टोचले. मोजमाप, भूसंपादन, दरातील तफावत आदी तक्रारी प्रशासनाने स्वतः मिटविण्याची सूचना करत ऊस उत्पादक शेतकरी, समृद्धी बाधित शेतकरी व प्रशासन समन्वय बैठक त्यासाठीच घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे पोचविणार असल्याचे सांगितले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी सोरमारे, समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी नानासाहेब पळसकर, बाळू हेकडे, वैजापूर, गंगापूर ,पळशी, बकलपूर, वरूड, पालखेड आदी गावांचे शेतकरी, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोंनगावकार, अनिल पोलकर, तालुकाप्रमुख रमेश बोरणारे, केतन काजे, भूपेश पाटील, मारुती राठोड आदींसह अधिकारी-शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना बागायती जमिनींना जिरायतीचे दर दिले. तसेच एकाच जमिनीची १ कोटी ४५ लाख आणि २३ लाख अशा मोठ्या फरकाने खरेदी होत असल्याने काही शेतकऱ्यांत संताप आहे. एक प्रकल्प एक दर याप्रमाणे जमिनीला भाव द्या, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

फतियाबाद येथील बाळू हेकडे म्हणाले, ‘‘आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. एक एकर जमिनीच्या मोबदल्यात जवळपास एक एकर जमीन घेता यायला हवी; मात्र तसे सध्या मिळणाऱ्या पैशात ते शक्‍य नाही. बाजारभाव ७० लाखांचा सुरू असताना १७ ते २४ लाखांपर्यंतचे दर देऊ केले आहेत.

नाना पळसकर म्हणाले, ‘‘जमीन देण्याची आमची इच्छाच नाही. आता आम्ही तयारी दाखवतोय, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांप्रमाणेच दर का देत नाहीत. वैजापूर येथील प्रा. रमेश बोरनारे यांनीही परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दरातील तफावत मांडली. शेतकरी व प्रशासनाच्या समन्वयासाठी झालेल्या या बैठकीचे काय फलीत निघते याकडे समृद्धीबाधितांचे लक्ष लागले आहे.

 

इतर बातम्या
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...