agriculture news in marathi, Samrudhi project affected farmers on strike in aurangabad, maharashtra | Agrowon

समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांचे उपोषण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : एकीकडे शासनाकडून महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमिनी खरेदीची सपाटा सुरू असताना शेतकऱ्यांवर अन्यायाची प्रकरणेही समोर येत आहेत. वैजापूर गंगापूर तालुक्‍यातील ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. जमीन बागायती असताना अलीकडे केवळ तीन वर्षे बागायत नसल्याचे कारण करून त्यांना बागायती जमिनीचा मोबदला देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

औरंगाबाद : एकीकडे शासनाकडून महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमिनी खरेदीची सपाटा सुरू असताना शेतकऱ्यांवर अन्यायाची प्रकरणेही समोर येत आहेत. वैजापूर गंगापूर तालुक्‍यातील ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. जमीन बागायती असताना अलीकडे केवळ तीन वर्षे बागायत नसल्याचे कारण करून त्यांना बागायती जमिनीचा मोबदला देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

वैजापूर मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वात ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या संदर्भात आमदार श्री. चिकटगावकर यांनी जिल्हा प्रशासनाला वस्तुस्थिती अवगत करणारे निवेदन सादर केले. त्यानुसार त्यांच्या वैजापूर गंगापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे; परंतु या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे अशा शेतीची नोंद केवळ तीन वर्षांचा पेरा बागायती नाही म्हणून कोरडवाहू अशी करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात सततच्या दुष्काळामुळे काही शेतकरी सातत्याने बागायती करू शकले नाहीत. त्यांनी विहीर, बोअर, पाइपलाइनसाठी कर्जाची उचल केली आहे. आधीच दुष्काळाने त्यांचे कंबरडे मोडले, त्यांच्या रोजीरोटीचे साधनही शासन हिरावत असताना त्यांच्या शेतीची बागायती असताना बागायती नोंद न घेणे अन्यायकारक असून त्यासाठी लावण्यात आलेला निकष तत्काळ रद्द करावा. ज्यांच्याकडे विहीर बोअर, पाइपलाइन आहे त्यांच्या शेतीची बागायती म्हणून नोंद घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...