ताकारी-म्हैसाळ, टेंभूचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ः संजय पाटील

ताकारी-म्हैसाळ, टेंभूचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ः संजय पाटील
ताकारी-म्हैसाळ, टेंभूचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ः संजय पाटील

सांगली : ताकारी-म्हैसाळ आणि टेंभूचे जास्तीत जास्त पंप सुरू करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचवण्याचे आदेश कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी दिले. सोमवारी (ता. ९) महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वारणालीत घेण्यात अाली.

अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, ए. एम. सिन्हा, एम. एस. जीवने, कार्यकारी अभियंता एम. एस. नलवडे, विजय पाटील, प्रशांत कडुस्कर, रेडीयार, पी. आर. पाटील उपस्थित होते.

खासदार पाटील यांनी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, म्हैसाळ योजनेच्या कालव्याची काही ठिकाणी दुरुस्ती सुरू आहे. पंपांची दुरुस्तीही प्रलंबित आहे.

खासदार पाटील म्हणाले, की पंपांच्या देखभालीतील अडचणींसंदर्भात मी मुंबईत पाठपुरावा करेन. अधिकाऱ्यांनी उपलब्ध पंपांच्या मदतीने प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी. विसापूर-पुणदीसह सर्व सिंचन योजनांचे जास्तीत जास्त पंप एकाचवेळी सुरू करावेत. यंदा पाऊस न झाल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागावर दुष्काळाचे सावट आहे.

शेतकऱ्यांना सिंचन योजनांच्या पाण्याचाच दिलासा आहे. नव्या आवर्तनाला पैसे भरण्यासाठी शेतकरी निश्‍चित पुढे येतील. शेतकऱ्यांच्या वाट्याचे १९ टक्के पैसे घेऊनच पाणी द्यावे. थकबाकीमुळे योजना अडचणीत येऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. जत, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्‍यात मागणी येईल तेथे प्राधान्याने पाणी द्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com