agriculture news in marathi, sand will be restarted | Agrowon

जळगाव जिल्ह्यात वाळूउपसा पुन्हा सुरू होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

वाळू चांगली मिळते, म्हणून गिरणा नदीतील वाळू गटांच्या लिलावावर प्रशासनाचा अधिक भर असतो. परंतु, यामुळे गिरणाकाठ कोरडाठाक झाला आहे. विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. शेती संकटात सापडली आहे. याचा विचारही प्रशासनाने करावा. 
- संजय चौधरी, शेतकरी, खेडी खुर्द (जि. जळगाव)

जळगाव : जिल्ह्यात सहा महिन्यांपासून बंद असलेला वाळूउपसा सुरू होण्याचे संकेत आहेत. वाळू गटाचे लिलाव जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहेत. एकूण २१ वाळू गटांचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यात पाच वाळू गटांच्या निविदांना प्रतिसाद मिळाल्याने त्या गटातून वाळूउपसा करण्याबाबत लवकरच आदेश निघतील. तब्बल सोळा वाळू गटांचे लिलाव आता पुन्हा काढले जातील. परंतु, वाळूउपशामुळे शिवारांत पाणीपातळी खालावत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून हा उपसा बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

जोगलखेडे (ता. भुसावळ),  कुरुंगी (ता. पाचोरा), मौजे बेलव्हाय-१ (ता. भुसावळ), बेलव्हाय-२ (ता. भुसावळ),  बेलव्हाय-२ (ता. भुसावळ) येथील वाळू गटांचे लिलाव झाले. पाचही वाळू गटांची एकत्रित अपसेट प्राइस १ कोटी ८९ लाख ३२ हजार ६३८ एवढी होती. त्याला ३ कोटी ३६ लाख ७६ हजार ३८० एवढी किंमत ठेकेदारांनी दिली. स्पर्धेच्या युगात अपसेटपेक्षा तब्बल सव्वापट रक्कम वाळू ठेकेदारांनी दिली. कुरंगी येथील ठेका गिरणा नदीच्या पात्रात, तर इतर चार ठिकाणचे ठेके वाघूर नदी पात्रात आहेत. 

संबंधित ठेकेदारांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले. ती भरल्यानंतर ठेक्‍याची रक्कम भरण्यास सांगून त्यांना वाळू गटातून वाळू उपशास परवानगी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू होत असतानाच शेतकऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. गिरणा, तापीकाठीदेखील पाणीटंचाई वाढू लागली आहे. प्रशासन महसुलाचा विचार करते, पण शिवाराचा, पिकांच्या सिंचनाचा विचार का करीत नाही, असा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे. 

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...