सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद

सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद
सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद

सांगली : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील कडेगाव, तासगाव यासह अनेक ग्रामीण भागात शुक्रवारी (ता. २७) गावे बंद करण्यात आली.

कडेगाव (जि. सांगली) येथील कराड-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून कार्यकर्ते जमले होते. सुमारे तीन तास रस्ता रोको करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील मोर्चेकरी आक्रमक झाले. निवेदन घेण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने आंदोलनात तीव्र असंतोष पसरला होता. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठा समाजाच्या गाव बंद हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी दिवसभर गाव बंद ठेवले. सावळज (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर मंदिरापुढे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान,  आमदार सुमनताई पाटील यांनी मराठा समाजाच्या मागणीस पाठिंबा देत सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणाचा कडक शब्दांत निषेध केला. आरक्षणासाठी आमदारकी पणाला लावू असे म्हणाल्या. जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठका होऊ लागल्या आहेत. बैठकीत गावेच्या गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच सर्व व्यवहार बंद करून सरकारचा निषेध करण्याचा चंग बाधला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com