agriculture news in marathi, Sangli District Bank disburses 298 crore crop insurance | Agrowon

सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून खरिपासाठी आतापर्यंत ४४ हजार २५६ शेतकऱ्यांना २९८ कोटी ६१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि एकरकमी परतफेड या योजनेमार्फत दिले आहे. मात्र, अद्यापही शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. 

सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून खरिपासाठी आतापर्यंत ४४ हजार २५६ शेतकऱ्यांना २९८ कोटी ६१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि एकरकमी परतफेड या योजनेमार्फत दिले आहे. मात्र, अद्यापही शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. 

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध होत नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. सध्या जिल्हाभर पेरणीची पूर्वतयारी करण्यात येत आहे. काही भागांत अत्यल्प पेरणी झाली आहे. मात्र, पेरणीअगोदर पीककर्ज देणे बॅंकांना बंधनकारक आहे. मात्र, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याने कर्ज देण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसते आहे. असे असताना जिल्हा बॅंकेने कर्जपुरवठा करण्यात अग्रेसर आहे. जिल्हा बॅंकेने सुमारे ५० टक्केहून अधिक कर्जाचे वाटप केले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आत्तापर्यंत ४४ हजार २५६ शेतकऱ्यांना २९८ कोटी ६१ लाख ६६ हजार रुपयांचे अल्प मुदतीचे १५ जूनपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये कर्जमाफी मिळालेल्या २०३८ शेतकऱ्यांना ९ कोटी ९४ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. नियमित कर्जाची परतफेड करून प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेतलेल्या ४१ हजार ३२१ शेतकऱ्यांना २८४ कोटी १३ लाख ९२ हजार रुपये, तर ओटीएस योजनेमध्ये ५०९ शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील कर्जाची रक्कम भरून कर्जमाफी मिळविली होती, त्या शेतकऱ्यांना २ कोटी ४८ लाख ६७ हजार रुपये पीककर्ज देण्यात आले. कर्जमाफी योजनेव्यतिरिक्त ३८८ शेतकऱ्यांना २ कोटी चार लाख ४१ हजार रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. बॅंकेकडे अद्यापही पीककर्जाचे प्रस्ताव सादर केले जात आहेत, त्याची पडताळणी करून पीककर्ज दिले जात आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जपुरवठा करण्यासाठी अद्यापही पुढे आलेल्या दिसत नाहीत. शेतकरी राष्ट्रीयीकृत बॅंकेत कर्जासाठी हेलपाटे मारत आहेत. बॅंक ऑफ इंडियाने २१, बॅंक ऑफ महाराष्ट्रने १८, सेंट्रल बॅंकेने ५, आयडीबीआय बॅंकेने ३२ तर आयसीआयसीआय बॅंकेने ११ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. मात्र, ही टक्केवारी फारच कमी आहे. कर्जवाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंका विलंब करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आमच्या भागात स्टेट बॅंकेची शाखा आहे. त्या बॅंकेत कोणतीही माहिती व्यवस्थित मिळत नाहीत. यंत्रणादेखील नीट नाही. त्यामुळे कर्ज मिळणे कठीण झाले आहे. मुळात माझे कर्जमाफीचे प्रोत्साहन अनुदानदेखील अद्यापही मिळालेले नाही.
- रवींद्र सूर्यवंशी, सूर्यगाव, ता. पलूस.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...