agriculture news in marathi, Sangli district bank got 4 crore loan waiver | Agrowon

सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी मिळाले ४ कोटी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या दहाव्या यादीतील कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी ४ कोटी २० लाख रुपये जिल्हा बॅंकेला मिळालेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे, असे बॅंक प्रशासनाने सांगितले.

सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या दहाव्या यादीतील कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी ४ कोटी २० लाख रुपये जिल्हा बॅंकेला मिळालेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे, असे बॅंक प्रशासनाने सांगितले.

मागील वर्षी जून महिन्यात शासनाने ही कर्जमाफी योजना जाहीर केली. प्रामाणिक शेतकऱ्यांना लाभाचे निकष ठरवले गेले. मात्र, वारंवार बदल केले गेले. कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी १० वी ग्रीन लिस्ट जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेशी संबंधित ३ हजार २३० शेतकऱ्यांचा समावेश आहे. ७ कोटी ५ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम मंजूर आहे. त्यापैकी चार कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. दोन हजार ३९१ शेतकऱ्यांना तीन कोटी ८५ लाख रुपयांचे प्रतिशेतकरी २५ हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदासाठी जिल्हा बॅंकेकडे चार कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध झाली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खाते अथवा सेव्हिंग्ज खात्यावर जमा करण्यात येत आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या ओटीएस योजनेखाली १८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना एक कोटी ८० लाख रुपये भरल्यानंतर एक कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत एक लाख १७ हजार ८२१ शेतकऱ्यांना २६६ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासह ओटीएसचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील २८ हजार ३८२ शेतकऱ्यांना १०५ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. तर ८६ हजार २६० शेतकऱ्यांना १३२ कोटी ७५ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. तीन हजार १७९ ओटीएससाठी २८ कोटी ७८ लाख रुपये मिळाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...