पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
ताज्या घडामोडी
सांगली : जलसंपदा विभागाकडील सांगली पाटबंधारे विभागात वर्ग १ ते ४ मध्ये एकूण १६०० पदे मंजूर आहे. त्यापैकी ८८५ कार्यरत असून, ७१५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणत्याच हालचाली सुरू केलेल्या नसल्याचे दिसते आहे. परिणामी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांची कामे, वसुली यांसह अन्य कामे वेळेत होत नाही. रिक्त पदे भरल्याशिवाय या योजनांची रखडलेली कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे.

सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना मोठ्या आहेत. या योजना अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. कालवा, पोटकालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी फील्डवर काम करतात. तसेच पाणीपट्टी वसुलीसाठीदेखील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते. मात्र, या विभागाकडे पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने याचा परिणाम या योजनेच्या कामावर होतो आहे.
सांगली पाटबंधारे विभागाकडे एकूण मंजूर पदे १६०० आहेत. त्यापैकी ७१५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे पाणीपट्टी वसुली, आवर्तन सोडणे यांसह अन्य कामे अधिकाऱ्यांच करावी लागत आहेत. सांगली पाटबंधारे विभाग आणि टेंभू प्रकल्प व्यवस्थान या दोन्ही कार्यालयांत कालवा निरीक्षक आणि मोजणीदार ही दोन पदे महत्त्वाची आहेत. कालवा निरीक्षक या पदावर १२८ पदे रिक्त आहेत. तर मोजणीदार याची ७३ पदे रिक्त आहेत.
कालवा निरीक्षक या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्य कालवा, पोटकालव्यांची दुरुस्ती आणि देखभाल ही कामे प्रामुख्याने पाहिली जातात. तर मोजणीदार या योजनांचे पाणी लाभक्षेत्राताला मिळाल्यानंतर क्षेत्राची मोजणी करणे व पाणीपट्टी आकारणी करणे, हे मुख्य काम आहे. मात्र, रिक्त पदे असल्याने ही कामे अधिकाऱ्यांनाच करावी लागते. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीचे काम संथगतीने सुरू आहे. शासनाने रिक्त पदे भरल्याशिवाय या योजना पूर्ण होणार नाही. त्यासाठी शासनाने लवकर पावले उचलावीत, अशी मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
विभाग | मंजूर | .कार्यरत | रिक्त |
मंडल कार्यालय | ३५ | २५ | १० |
सांगली पाटबंधारे विभाग | ४४५ | २३८ | २०७ |
लघू पाटबंधारे विभाग. | १२४ | ८२ | ४२ |
टेंभू उपसा १ सांगली | १२४ | ७८ | ४६ |
टेंभू प्रकल्प व्यवस्थापन ओगलेवाडी | ४१०. | १९७ | २१३ |
ताकारी पंप क्र. १ देवराष्ट्रे. | १०६ | ६४ | ४२ |
ताकारी म्हैसाळ उपसा व्यवस्थापन विभाग सांगली | १९६ | ११९ | ७७ |
म्हैसाळ पंप क्र. २ सांगली | १६० | ८५. | ७५ |
एकूण वर्ग १ ते ४ | १६०० | ८८५ | ७१५ |
- 1 of 349
- ››