शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईक

शेतकऱ्यांने तयार केली डिझेलवरची बाईक
शेतकऱ्यांने तयार केली डिझेलवरची बाईक

सांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग केला आहे. पेट्रोलची दुचाकी चक्क तो डिझेलवर चालवतो आहे. एका लिटरमध्ये ११० किलोमीटर इतके 'अॅव्हरेज' मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेली दहावर्षे ते ही दुचाकी वापरत आहेत. मल्लापा भैराप्पा जाबगौड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जत तालुक्यातील बसर्गी येथील मल्लाप्पा यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर डिझेलवर चालणारी दुचाकी तयार केली आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि कमी मायलेज यापासून सुटका करुन घेतली आहे. मल्लाप्पा अवघे ५ वी पास  आहेत. पण दुचाकीत काही तांत्रिक बदल करून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.  मल्लापांच्या डिझेल बाईकचा व्हीडिअो पहा...

डिझेलवर चालण्यासाठी गाडीत हे केले बदल

1. प्लगचा पाईंट वाढवले २. कार्बोरेटरमध्ये बायपास अल्टरेशन  ३. जेट नट बदलला

गावापासून दूर असलेल्या शेतात मल्लापा आपल्या कुटुंबा समवेत राहतात .शेती हा मल्लापा यांचा मुख्य व्यवसाय आहे. शिवाय बोअरवेल दुरुस्त करण्याचे काम ही ते करतात. शेती कामासह अन्य कामासाठीही या दुचाकींचा वापर ते करत असतात. दुचाकीचे पिकअप ही इतर दुचाकी प्रमाणे दमदार आहे. मात्र हा प्रयोग सर्व दुचाकीमध्ये करणे शक्य नसून काही ठराविक दुचाकीमध्येच शक्य असल्याचे मल्लप्पा यांनी आवर्जून सांगितले आहे .

पेट्रोलचे अधिक असणारे दर, गाडीचे कमी मायलेज आणि गावापासून दूर असणारे पेट्रोल पंप यावर मात करण्यासाठी तसेच घरी ठेवण्यासाठी अतिरिक्त पेट्रोल मिळत नसल्याने दुचाकी डिझेलवर चालवता येते का याचा प्रयोग मला करावा वाटला. प्रथम अपयश आले पण नंतर काही तांत्रिक बदल करून त्यात मी यश मिळवले.

- मल्लापा जाबगौंड संपर्क : ९४२१२२६७८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com