agriculture news in marathi, Sangli, farmers awaiting for mismatch loanwaiver scheme list | Agrowon

सागंली कर्जमाफीतील ‘मिसमॅच-२' यादीतील पात्र-अपात्रतेकडे लक्ष
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ‘मिसमॅच-२'' यादीतील २० हजार ८४२ शेतकऱ्यांच्या पात्र-अपात्रतेकडे लक्ष लागले आहे. विकास सोसायटी व बॅंक स्तरावर माहितीची छाननी व लेखापरीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांची माहिती तालुकास्तरीय समितीकडे अंतिम निर्णयासाठी जाणार आहे. 

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ‘मिसमॅच-२'' यादीतील २० हजार ८४२ शेतकऱ्यांच्या पात्र-अपात्रतेकडे लक्ष लागले आहे. विकास सोसायटी व बॅंक स्तरावर माहितीची छाननी व लेखापरीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांची माहिती तालुकास्तरीय समितीकडे अंतिम निर्णयासाठी जाणार आहे. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (दि. ८) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेणार आहेत. जिल्हा उपनिबंधक, बॅंकांचे प्रतिनिधी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.
कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन भरलेली माहिती आणि विकास सोसायटी, बॅंकेकडून सादर झालेली माहिती याचा राज्यस्तरावर ताळमेळ न लागलेल्या (मिसमॅच-१) यादीतील ५७ हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडून आली होती. यापैकी ४८ हजार शेतकऱ्यांच्या माहितीची छाननी झाली आहे. ३९ हजार पात्र, तर ९ हजार शेतकरी अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्रुटींच्या यादीतील १९ हजार ४६३ शेतकरी अपात्र ठरले होते. 

जिल्ह्यात एकूण ५८ हजार शेतकरी अपात्र ठरलेले आहेत, तर ९१ हजार शेतकऱ्यांना १८७ कोटींचा लाभ झालेला आहे. दरम्यान, २० हजार ८४२ शेतकऱ्यांची ‘मिसमॅच-२'' यादी शासनाकडून सोमवारी आली आहे. या यादीतील माहितीची विकास सोसायटी व बॅंकस्तरावर छाननी सुरू झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी पूरक माहिती सादर करायची आहे. ‘मिसमॅच-२'' यादीतील माहितीची छाननी झाल्यानंतर लेखापरीक्षकांकडून पडताळणी व त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून पात्र-अपात्रतेवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. ‘मिसमॅच-२'' यादीत किती शेतकरी पात्र, किती अपात्र ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...