agriculture news in marathi, Sangli grew increasingly due to drought | Agrowon

सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पंधरा दिवसांत आणखी २० गावांत नव्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील ६१ गावे आणि ३८० वाड्या, वस्त्यांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी खेपा देण्याचे मंजूर आहे. मात्र, मंजूर खेपाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. कागदोपत्री खेपा टाकल्याचे दाखवून बिले काढण्याचा उद्याेग सुरू आहे. संबंधित विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे. 

सांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पंधरा दिवसांत आणखी २० गावांत नव्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील ६१ गावे आणि ३८० वाड्या, वस्त्यांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी खेपा देण्याचे मंजूर आहे. मात्र, मंजूर खेपाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. कागदोपत्री खेपा टाकल्याचे दाखवून बिले काढण्याचा उद्याेग सुरू आहे. संबंधित विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे. 

पावसाळ्यात दुष्काळी भागातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ यासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दुष्काळी तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत असून, या गावे आणि टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे.

डिसेंबरअखेर जिल्ह्यातील जत १०, कवठेमहांकाळ पाच, खानापूर तीन, आटपाडी १० आणि तासगाव एक अशा ४१ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये जानेवारीपासून दुपटीने वाढ झाली. सध्या जिल्ह्यातील ६१ गावे आणि ३८० वाड्यावस्त्यांना ५१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील २३, आटपाडी १६, कवठेमहांकाळ ६, खानापूर ५ आणि तासगाव एक अशा ६१ गावांचा समावेश आहे. 

फेब्रुवारीत आणखी संख्या वाढणार

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही गावे आणि वाड्या-वस्त्यांना पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता असल्याने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून त्यात आणखी वाढ होणार आहे. 

मंजूर खेपा कागदोपत्रीच

दुष्काळाची दाहकता, पाण्याची मागणी वाढतच असताना टँकरचालकांकडून मंजूर खेपा टाकल्या जात नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. आठ-आठ दिवस पाण्याचा टँकर येत नाही. या कालावधीत पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. सध्या ६१ गावे आणि ३८० वाड्यावस्त्यांना १४७ खेपा मंजूर आहेत. मात्र अनेक ठिकाणी याप्रमाणे खेपा टाकल्या जात नाहीत. कागदोपत्री खेपा टाकल्याचे दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...