सांगली, जळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महापालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. मतमोजणी ३ ऑगस्टला होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात सोमवारपासून (ता. २५) आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.

श्री. सहारिया म्हणाले, की सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची मुदत १३ ऑगस्ट २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ असून, मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.

जळगाव महापालिकेची मुदत १९ सप्टेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ६० हजार २२८ असून, मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार १५ इतकी आहे. एकूण १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३८ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४; तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

वसई-विरार शहर महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९७ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील १ ऑगस्टला मतदान होईल. या सर्व ठिकाणी ४ जुलैपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरवात होईल. १ ऑगस्टला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ३ ऑगस्टला सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com