agriculture news in marathi, In the Sangli market the rate of average of Rs 7 thousand | Agrowon

सांगली बाजारात हळदीला सरासरी ७ हजार ५०० रुपये दर
अभिजित डाके
मंगळवार, 5 जून 2018

सांगली ः हळदीच्या उत्पादनात वाढ झाल्याने सांगली बाजारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक अावक झाली अाहे. त्याचा परिणाम दरावर ही झाला अाहे. सध्या सांगली बाजार समितीत हळदीला सरासरी ७ हजार ५०० रुपये असा दर मिळतो आहे.
देशामध्ये अपेक्षेपेक्षा हळदीचे उत्पादन वाढल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम हळदीच्या दरावर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत हळदीचे दर १ हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. अतिरिक्त उत्पादनाचा हळद शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

सांगली ः हळदीच्या उत्पादनात वाढ झाल्याने सांगली बाजारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक अावक झाली अाहे. त्याचा परिणाम दरावर ही झाला अाहे. सध्या सांगली बाजार समितीत हळदीला सरासरी ७ हजार ५०० रुपये असा दर मिळतो आहे.
देशामध्ये अपेक्षेपेक्षा हळदीचे उत्पादन वाढल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम हळदीच्या दरावर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत हळदीचे दर १ हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे. अतिरिक्त उत्पादनाचा हळद शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

देशात यंदा ६५ ते ७० लाख पोत्यांचे (६० किलोचे एक पोते) उत्पादन होईल, असा अंदाज हळद उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. दरम्यान, हळदी हंगामाच्या सुरवातीस हळदीचे दर प्रतिक्विंटलला दीड हजार रुपयांनी वाढ होऊन ते सरासरी १० ते ११ हजारपर्यंत होते. त्यामुळे तेजी असल्याने हळद विक्रीसाठी शेतकरी पुढे आहे. मात्र, अपेक्षेपेक्षा १० लाख पोत्यांनी हळदीच्या उत्पादनात वाढ झाली. याचा परिणाम हळदीच्या दरावर होऊ लागला. मात्र, हळदीचे दर टिकून राहिले नाहीत. हळदीच्या उत्पादनात झालेली वाढ आणि हळदीची कमी झालेली मागणी यामुळे देशांतर्गत हळदीच्या दरात सुमारे दीड हजार रुपयांनी घसरण झाल्याने हळदीचा रंग फिका झाला. हळदीच्या दरात १ हजार ५०० रुपयांनी घट झाली.

सांगली बाजार समितीत नांदेड, पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू बसमत या भागातून हळद विक्रीसाठी येते. या राज्यातून अजून १ लाख पोती विक्रीस येणे अपेक्षित आहे. मात्र, हळदीच्या दरात घसरण झाल्याने एक लाख पोती शिल्लक राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या आंध्र, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांत हळदीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये असा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. यामुळे हळद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांकडे २० लाख पोती शिल्लक
देशात अपेक्षेपेक्षा १० लाख पोत्यांचे अतिरिक्त उत्पादन वाढून ते सुमारे ८० लाख पोत्यांचे उत्पादन झाले. अद्याप देशभरातील शेतकऱ्यांकडे २० लाख पोती हळद शिल्लक आहे.
 

शेतकरी म्हणतात...
दर कमी करण्यासाठी व्यापारीच कारणीभूत आहेत. आवक कमी आहे. मात्र, दर वाढविण्यासाठी व्यापारी पुढे येत नाहीत. व्यापाऱ्यांनीच हळदीचे दर पाडले आहेत.

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...