सांगलीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतली तूरडाळ

सांगलीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतली तूरडाळ
सांगलीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतली तूरडाळ

सांगली ः दूध आणि तुरीला भाव मिळत नसल्याने उपजिल्हाधिकारी यांच्या टेबलवर तूरडाळ ओतून किसान सभेच्या वतीने निषेध व्यक्त करीत मंगळवारी (ता. ५) आंदोलन केले. तसेच येत्या ७ तारखेला दूध आणि भाजीपाला रोखणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत आहेत. दूध दराचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन कोणतेही दूध संघ पालन करताना दिसत नाहीत.

उमेश देशमुख म्हणाले, `राज्यात दुधाचा महापूर आहे, असे शासन म्हणत आहे. असे असताना कर्नाटक आणि गुजरातमधून दररोज ३० लाख लिटर दूध राज्यात येत आहे. शासनाने दुधाचे दर कृत्रिमरीत्या कमी केले आहेत. तुरीला भाव मिळत नसल्याने लाखो टन तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. तरीदेखील तुरीची खरेदी केली जात नाही. देशात साखर पडून आहे. मात्र पाकिस्तानमधून साखर आयात केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला संपवण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप ही करण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना साखर, तूर आणि

दूध देऊन ते मुख्यमंत्री यांना आज दिले. मात्र, सांगली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी यांनी साखर, तूर आणि दूध घेतले नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहे. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी, गवस शिरोळकर, सुदर्शन घेरडे, दिलीप शुक्‍ला, नंदकुमार गोडबोले, बाळासाहेब गुरव, युवराज गुरव आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com