सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३० रुपये

सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३० रुपये
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २८५० ते ३६३० रुपये

सांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात आहे. बुधवारी (ता. १०) गुळाची ३०९३ क्विंटल आवक झाली त्यास प्रतिक्विंटल २८५० ते ३६३० रुपये, तर सरासरी ३२४० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. हळदीच्या दरात तेजी मंदी आहे. राजापुरी हळदीची २०९५० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६००० ते १२८०० तर सरासरी ९४०० रुपये असा दर होता. ज्वारी (हायब्रीड)ची १८३ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीस प्रतिक्विंटल २४३० ते २४५० तर सरासरी २४४० रुपये असा दर मिळाला. परपेठी हळदीची ३५६३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४८०० ते ८२५० तर सरासरी ६५२५ रुपये असा दर होता. 

ज्वारी (शाळू)ची १९५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २७४०० ते ४२०० तर सरासरी ३४५० रुपये असा दर होता. गव्हाची १३० क्विंटल आवक झाली. गव्हास प्रतिक्विंटल २००० ते ३००० तर सरासरी २५०० रुपये असा दर मिळाला. बाजरीची ११० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २१०० ते २३५० तर सरासरी २२२५ रुपये असा दर होता.

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची ४८५५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३५० ते ९०० असा दर मिळाला. बटाट्याची १३०७ क्विंटल आवक झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये असा दर मिळाला. लसणाची १०० क्विंटल आवक झाली. लसणास प्रतिक्विंटल ८०० ते २४०० रुपये असा दर मिळाला. 

आल्याची ७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ८०० ते २४०० रुपये असा दर होता. डाळिंबाची ६६८० डझनाची आवक झाली होती. डाळिंबास प्रतिदहा किलोस १५० ते ४५० रुपये असा  दर मिळाला. चिक्कूची ३६५० डझनाची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस १५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. कलिंगडाची २३२ डझनाची आवक झाली असून त्यास प्रतिदहा डझनास ५०० ते २००० रुपये असा दर होता. सफरचंदाची १२७ पेटीची आवक झाली असून, त्यास प्रतिपेटीस ७५० ते १५०० रुपये असा दर होता. आंब्याची ७०६९ बॉक्स (चार डझनाचे एक बॉक्स) आवक झाली होती. आंब्यास प्रतिबॉक्स ५०० ते ३००० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com