agriculture news in marathi, sanglis 2681 farmars loan apologies | Agrowon

सांगलीच्या आणखी २८६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची आठवी ग्रीन लिस्ट अखेर प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यात आणखी २ हजार ८६१ शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले आहेत. लाभाची रक्कम ५ कोटी ३९ लाख १३ हजार ४४९ रुपये आहे. ६९ शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी २३.८४ लाख भरल्यास त्यांचे ४६.४८ लाख माफ होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची आठवी ग्रीन लिस्ट अखेर प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यात आणखी २ हजार ८६१ शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले आहेत. लाभाची रक्कम ५ कोटी ३९ लाख १३ हजार ४४९ रुपये आहे. ६९ शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी २३.८४ लाख भरल्यास त्यांचे ४६.४८ लाख माफ होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

मिसमॅच व अनमॅच यादीतील त्रूटी दूर करून शेतकऱ्यांची नावे आठव्या ग्रीन लिस्टमध्ये अंतर्भूत होणार होती. शिवाय काही शेतकरी हे कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, पण सात ग्रीन लिस्टमध्ये त्यांचा समावेश नाही. तेही आठव्या ग्रीन लिस्टच्या प्रतीक्षेत होते. आठवी ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. कर्जमाफीसाठी ४०३ शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीची रक्कम १ कोटी ३७ लाख ४८ हजार ८६३ आहे. प्रोत्साहन अनुदानासाठी २ हजार ४५८ शेतकरी पात्र ठरले असून अनुदानाची रक्कम ४ कोटी १ लाख ६४ हजार ५८६ रुपये आहे.

ओटीएससाठी ६९ शेतकरी पात्र ठरले आहेत. दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाखाचे कर्ज माफ होते. त्याअंतर्गत दीड लाखावरील कर्जाचे २३ लाख ८४ हजार २५१ रुपये भरल्यास ४६ लाख ४७ हजार ९७२ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. ओटीएसमध्ये सहभाग घेण्यासाठी ३० जून अंतिम मुदत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरून दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले आहे.

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...