सांगलीतील धरणं ७० टक्के भरली

सांगलीतील धरणं ७० टक्के भरली
सांगलीतील धरणं ७० टक्के भरली

सांगली  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भागात चांदोली धरण परिसरात संततधार सुरू आहे. चोवीस तासांत धरण परिसरात ८४ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली असून, धरणात २५.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणं ७० टक्के भरले आहे. संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी आले आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत मध्यम पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुके वगळता इतर तालुक्‍यांत दमदार पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात गुरुवारपासून धुव्‍वाधार पाऊस सुरू असून, ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून, वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे नदी काटावरील पिके पाण्यात गेली आहेत. कोकरुड-रेठरे (ता. शाहुवाडी) बंधारा पूल आणि येळापूर येथील मेणी ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसाने भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

कोकरुड-रेठरे वारणामधील असणारा बंधारा पूल यावर्षी सलग दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने रेठरे, कोतोली, गोंडोली, जोंधळेवाडी, भराडवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. शिराळा पश्‍चिम भागातील कोकरुडसह शेडगेवाडी, खिरवडे, हत्तेगाव येळापूर, मेणी, पाचगणी परिसरातील खरीप हंगामातील भात, ऊस पिके शेतातील पाण्यात गेली आहेत.

गेल्या २४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये
मिरज १२.५
जत ६.९
खानापूर-विटा १३.६
इस्लामपूर-वाळवा २१.२
तासगाव ७.४
शिराळा ६०.५
आटपाटी ०.७
कवठेमहांकाळ ६.७
पलूस १६.३
कडेगाव १८.६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com