agriculture news in marathi, Sangli's loan waiver repeat names remove | Agrowon

सांगलीतील कर्जमाफीची दुबार नावे वगळली
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

सांगली : कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्यातील दुबार नावे वगळण्यात आली आहेत. चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान लाभ शुक्रवार (ता. २९)पासून दिला जाणार असून, यासाठी जिल्हा बॅंक व विकास सोसायटी स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

सांगली : कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्यातील दुबार नावे वगळण्यात आली आहेत. चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान लाभ शुक्रवार (ता. २९)पासून दिला जाणार असून, यासाठी जिल्हा बॅंक व विकास सोसायटी स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत चौथ्या टप्प्यातील सुधारित यादीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ओटीएससाठी १९ हजार शेतकऱ्यांची यादी जिल्हा बॅंकेला आली होती. मात्र या यादीत अनेक त्रुटी आढळल्या. सात ते आठ हजार शेतकरी डबल लाभार्थी ठरले. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील यादीत नाव असताना पुन्हा चौथ्या टप्प्यातील यादीत नाव आले.

दुबार आलेली नावे वगळली आहेत. दुबार लाभार्थी नावे सोडून पात्र लाभार्थींना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरवात झाली आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर चौथ्या यादीतील दुबार लाभार्थींची संख्या समजू शकेल, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले.

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे १७७ कोटी रुपये शासनाकडून जिल्हा बॅंकेला आलेले आहेत. त्यापैकी सुमारे १५ ते १६ कोटी रुपये शिल्लक आहेत. चौथ्या टप्प्यातील यादीतील पात्र शेतकऱ्यांना या रकमेतून लाभ दिला जाणार आहे. आणखी रकमेची गरज भासली तर शासनाकडून तातडीने उपलब्ध होईल. रक्‍कम शिल्लक राहिली तर परत शासनाकडे पाठविली जाईल. दरम्यान काही शेतकऱ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांतील यादीत टप्प्या-टप्प्याने रक्‍कम आली आहे. ही एकत्रित रक्‍कम पात्र लाभाएवढी असेल तर लाभाची रक्‍कम संबंधितांच्या खात्यांवर वर्ग केली जाणार आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...