agriculture news in marathi, Sangola Sugar Factory Under the control of State Bank | Agrowon

सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी (शिखर) बँकेने अखेर ताब्यात घेतला. या कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८७ कोटी ७२ लाख रुपये अडकले आहेत. हा कारखाना त्वरित विकून ही रक्कम वसूल करून द्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेने केली. जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 

सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी (शिखर) बँकेने अखेर ताब्यात घेतला. या कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८७ कोटी ७२ लाख रुपये अडकले आहेत. हा कारखाना त्वरित विकून ही रक्कम वसूल करून द्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेने केली. जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 

सांगोला कारखान्याला राज्य बँकेसह जिल्हा मध्यवर्ती बँक, पंढरपूर अर्बन बँक, ब्रह्मदेवदादा माने या सहकारी बँकांनी कर्जे दिली. ती सगळी सध्या थकीत आहेत. राज्य बँकेने हा कारखाना इतरांना चालविण्यास देण्याची तयारी दर्शवली होती. त्याला जिल्हा बँकेने विरोध केला. त्याची विक्री करूनच थकबाकी वसूल करून द्यावी, असा आग्रह धरला. अखेरीस शिखर बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतली. 

जिल्हा बँकेकडील अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) ३१ टक्के झाले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार ३० मे २०१८ रोजी बँकेचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासक शैलेश कोतमिरे वसुलीसाठी मोहीम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कारवाईकडे पाहिले जाते. आता हा कारखाना भाड्याने चालविण्यास देण्याचा विचार आहे.

शिखर बँकेने आजपर्यंत सात कारखाने ताब्यात घेतले. त्यानंतर ते भाड्याने चालविण्यास दिले. चांगल्या पद्धतीने भाडे मिळतेय. त्याच पद्धतीने सांगोला कारखाना भाड्याने चालवायला देता येईल का? याचा विचार सुरू आहे. अर्थातच ज्या बँकांनी कर्जे दिली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांनी दिली.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...