agriculture news in Marathi, sanjay dhotre says, priority for strengthening of agri university, Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणाला प्राधान्य : संजय धोत्रे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांची अधीस्वीकृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठांना बळकट केले जाईल, असे संकेत महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला नवनियुक्त उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी दिले.

परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांना राज्य शासनाने मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदावर खा.धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. पदभाव स्वीकारताना अनौपचारिक चर्चेत त्यांनी विद्यापीठांना बळकट करण्याकडे आपला कल राहील, असे स्पष्ट केले.

पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांची अधीस्वीकृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठांना बळकट केले जाईल, असे संकेत महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला नवनियुक्त उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी दिले.

परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांना राज्य शासनाने मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदावर खा.धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. पदभाव स्वीकारताना अनौपचारिक चर्चेत त्यांनी विद्यापीठांना बळकट करण्याकडे आपला कल राहील, असे स्पष्ट केले.

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, माजी कृषी संचालक जयंत महल्ले, कृषी परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के तसेच इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘‘राज्यातील कृषी विद्यापीठांची गुणवत्तावाढ आणि संशोधनाला चालना देण्याचा आपला प्रय़त्न राहील. विद्यापीठांची अधिस्वीकृती कायम राहण्यासाठी अत्यावश्यक असलेली भरती केली जाईल. विद्यापीठे आणि कृषी परिषदेच्या समन्वयात वाढ केली जाईल,’’ असेही खा. धोत्रे म्हणाले.
माजी कुलगुरू डॉ. मायंदे या वेळी म्हणाले, की राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची स्वतःची वेगळी क्षमता आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार अडीअडचणी समजून घेत विद्यापीठांमधील मूलभूत संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांचे बळकटीकरण हे राज्याच्या कृषी प्रगतीला उपयुक्त ठरणारे राहील.

राज्यातील शेती आणि शेतकरी बिकट वाटचालीतून जात असताना कृषी परिषद आणि कृषी विद्यापीठांची भूमिका अतिशय मोलाची आहे, असे मत श्री.तिवारी यांनी व्यक्त केले. ‘परिषदेचे ऩवे उपाध्यक्ष शेतकरी आणि शेती क्षेत्राची अतिशय बारकाईने माहिती असलेले आहेत. त्यातून परिषदेच्या कामकाजाला वेग येईल,’ असेही ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...