agriculture news in Marathi, sanjay dhotre says, will work with farmer welfare, Maharashtra | Agrowon

शेतकरी केंद्रित काम करणारः संजय धोत्रे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे/अकोला : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद ही माझ्या दृष्टीने शेतकरी, कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. कृषी शिक्षणातील संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी शेतकरी व विद्यार्थीकेंद्रित काम करणार असून विद्यापीठांच्या कामकाजाला चालना देणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी सांगितले.

पुणे/अकोला : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद ही माझ्या दृष्टीने शेतकरी, कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. कृषी शिक्षणातील संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील. मी शेतकरी व विद्यार्थीकेंद्रित काम करणार असून विद्यापीठांच्या कामकाजाला चालना देणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी सांगितले.

विदर्भातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘‘वादविवाद आणि न्यायालयीन तंट्यामुळे कृषी परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीचा मुद्दा राज्य सरकारसाठी कळीचा बनला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार धोत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परिषदेवर ते पुढील तीन वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम बघतील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

उच्चशिक्षित खासदारांच्या यादीत नाव घेतले जात असलेले श्री. धोत्रे यांनी अकोल्याच्या पळसो बढे येथे प्राथमिक शिक्षण घेत पुणे विद्यापीठातून यंत्र अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते विधी पदवीधरदेखील असून केंद्रिय कृषिमंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. विद्यापीठे भरती मंडळाच्या अध्यक्षपदावर स्वतःच्या नियुक्ती करून घेण्याचा अजिबात अधिकार नाही, असा निर्वाळा राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिला आहे. 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ तसेच कृषी शिक्षण व संशोधनात महत्त्वाची भूमिका असलेल्या कृषी परिषदेला गेल्या काही महिन्यांपासून उपाध्यक्ष नव्हता. त्यामुळे कृषी विद्यापीठांमधील भरतीदेखील रखडली आहे. 

तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांच्या कारभारामुळे कृषी परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. खर्चे यांनी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाचे अध्यक्षपद कब्जात घेण्यासाठी स्वतःच्या स्वाक्षरीनेच मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतःची नेमणूक करून घेतली. हा मुद्दा गाजल्यामुळे खर्चे यांना मुदतवाढ मिळाली नाही.  ‘‘श्री. धोत्रे यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी किंवा राज्य शासनाची मर्जी असेल तोपर्यंत राहील. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या उपाध्यक्षासाठी शासनाने मंजूर केलेल्या सर्व सुविधा मिळतील,’’ असे कृषी खात्याचे सहसचिव दे. आ. गावडे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...