‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय धोत्रे विजयी

‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय धोत्रे विजयी
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय धोत्रे विजयी

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत खासदार संजय धोत्रे यांनी विजय मिळविला. खासदार धोत्रे हे ‘महाबीज’वर पाचव्यांदा संचालक बनले अाहेत. महाबीजच्या मुख्यालयात शनिवारी (ता. २०) झालेल्या मतमोजणीत धोत्रे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत गावंडे यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. अकाेला मतदारसंघात खासदार धोत्रे व प्रशांत गावंडे यांच्यात थेट लढत झाली. महाबीजच्या कृषक भागधारकांनी यासाठी मतदान केले.  महाबीजच्या संचालक मंडळावर दोन संचालक निवडून दिले जातात. अकोला व उर्वरित मतदारसंघातून सहा अर्ज महाबीजकडे प्राप्त झाले होते. त्यात उर्वरित मतदार संघातील तिघांनी अर्ज मागे घेतल्याने अमडापूरचे (जि. बुलडाणा) वल्लभराव देशमुख हे बिनविरोध झाले होते. त्यामुळे एकाच संचालक पदासाठी मतदान झाले. यात खासदार धोत्रे व गावंडे हे दोनच उमेदवार समोरासमोर होते. धोत्रे यांना ९४०६ मते, तर गावंडे यांना ३९८३ मते मिळाली.  महाबीज हे शासनाचे महामंडळ असून, शेतकऱ्यांना कायम योग्य दरात व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिले जाते. अाज खासगी कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री करतात. अशावेळी या महामंडळाचे अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. अापण संचालक म्हणून महामंडळाच्या सभासदांचे व शेतकऱ्यांचे हित कायम जोपण्यासाठी प्रयत्नरत राहू, असे विजयानंतर खासदार धोत्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com